Breaking News

योगीं आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशातील ३७ वर्षाचा रेकॉर्ड मोडलाः दुसऱ्यांदा सत्ता ग्रहण मतांची टक्केवारीही वाढली

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत ३७ वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढत पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ सरकारने आपला करिश्मा दाखवित दुसऱ्यांदा विजय मिळविला. त्यामुळे युपीत पुन्हा एकदा योगी आदित्यनाथचाच डंका वाजणार असल्याचे सिध्द झाले. त्याचबरोबर भाजपाच्या मतांच्या टक्केवारीतही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळी मतमोजणीस सुरुवात झाल्यापासून उत्तर प्रदेशात ४०३ जागांपैकी थेट २५० हून अधिक जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येत होते. तर सकाळी ३०० जागांपेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु दुपारी हा आकडा पुन्हा खाली येत २५० च्या आसपास आल्याचे चित्र पाह्यला मिळाले. परंतु दुपारी ४ नंतर पुन्हा वाढ होत हा आकडा २६६ वर पुन्हा पोहचला. तर २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीतील मतांच्या टक्केवारीच्या तुलनेत यंदाच्या निवडणूकीत ५ टक्के मते वाढल्याचे दिसून येत आहे. गतवेळी ४४ टक्के मते मिळाली होती. त्यात टक्के अर्थात ४९ टक्के मते मिळाल्याचे दिसून येत आहे.

काहीही करून यावेळी योगी सरकारचा पराभव करायचाच म्हणून समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी राज्यातील अनेक छोट्या-मोठ्या राजकीय पक्ष, संघटनांसोबत युती केली. त्यानुसार भाजपाच्या संख्येच्या निम्म्या संख्येवर चांगली लढत देत असल्याचे दिसून आले. परंतु त्यांना समाधानकारक यश मिळाल्याचे दिसून आले. त्यांच्या सहयोगी पक्षाला अपना दलला ११ जागांवर तर राष्ट्रीय लोक दलास ७ जागांवर विषय मिळाल्याचे दिसून येत आहे.

गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांची विक्रमी मताधिक्याने घौडदोड करत विजय मिळविल्याचे सांगण्यात येत आहे. तर मुलायम सिंग यांच्यानंतर अखिलेश सिंग यांनी परंपरागत करहाल मतदारसंघातही आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेसमधील अनेक दिग्गज पराभवाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र या निवडणूकीत पाह्यला मिळाले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *