Breaking News

निकालानंतर सोनिया गांधींनी बोलावली बैठक तर राहुल गांधीं म्हणाले… पंजाबमधील दारूण पराभमामुळे काँग्रेस गारठली

विधानसभा निवडणूकीला अवघे सात-आठ महिन्याचा कालावधी शिल्लक राहीलेला असताना काँग्रेसमधील अंतर्गत दुफळीने तोंड वर काढले. या दुफळीला शांत करता करता काँग्रेसच्या नेत्यांना नाकीनऊ आले. परंतु अखेर समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. तर दुसऱ्याबाजूला ऐन निवडणूकीत नवज्योत सिंग सिध्दू यांनी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना लक्ष्य करायला सुरुवात केली. यामध्ये त्यांचे कुटुंबियही सहभागी झाले. त्यामुळे इतकी अंतर्गत उसळलेल्या दुफळीमुळे काँग्रेसचा पराभव अटळ असल्याचे मानले जावू लागले. आणि त्यानुसार विधानसभेचा निकालही आला.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री चन्नी हे दोन मतदारसंघातून निवडणूकीस उभे होते. परंतु या दोन्ही ठिकाणी पराभूत व्हावे लागले. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेने दिलेला निकाल नम्र स्विकारत असल्याचे सांगत या झालेल्या चुकांमधून आम्ही शिकून त्यात दुरूस्ती करू असे सांगत विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि भविष्यातही जनतेच्या चांगल्यासाठी काम करत राहु अशी प्रतिक्रिया ट्विटद्वारे दिली.

पंजाबमधील दारूण पराभवानंतरही काँग्रेस आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणात गुंतलेली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने ९३ जागांवर विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, पंजाबमध्ये काँग्रेसची १७ जागांवर घसरण झाली. या पराभवासाठी त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला किंवा अन्य कोणत्याही नेत्याला दोष दिलेला नाही. तर या पराभवाचे खापर काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर फोडले आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग हे साडेचार वर्षे पंजाबचे मुख्यमंत्री होते आणि जनता त्यांच्यावर नाराज होती. कॅप्टन यांच्या कारभारामुळे सत्ताविरोधी वातावरण होते आणि त्यामुळे आम्ही जनतेला समजावून घेऊ शकलो नाही. आपण निवडणूक हरलेलो असू, पण हिंमत हारलेली नाही. आम्ही सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.

रणदीप सुरजेवाला म्हणाले की, आम्ही गोवा आणि उत्तराखंडमध्ये पूर्ण ताकदीनिशी लढलो, पण जनतेला पटवून देऊ शकलो नाही. धार्मिक प्रश्न सोडून जनतेच्या प्रश्नांवर निवडणूक लढण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केला. शिक्षण, आरोग्य या सर्व गोष्टींवर आम्ही पूर्ण लक्ष केंद्रित केले. पण भावनिक प्रश्नांनी जनमानसाचा ताबा घेतला आहे. निवडणुकीत आम्ही जिंकलो किंवा हरलो, पण जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही काम करत राहू. आम्ही आत्मपरीक्षण करू आणि पराभवाच्या कारणांवर विचार करू. लोकांसाठी काम करणार आणि भविष्यात अधिक चांगल्यासाठी प्रयत्न करणार आहोत. निकालांनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निर्णय घेतला आहे की केंद्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली जाईल, ज्यामध्ये पराभवाचा आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

अतुल लोंढे यांचा सवाल, संचालकांवरील कारवाईचे स्वागत, पण नितीन गडकरींवर कारवाई कधी?

भारतीय जनता पक्षाचे नागपूर मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याच्या तक्रारीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *