Breaking News

ताटकळलेल्या उदयनराजे भोसले यांना अखेर भाजपाकडून उमेदवारी जाहिर

लोकसभा निवडणूक २०२४ सालच्या सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर उदयनराजे भोसले यांच्या यांना भाजपाने उमेदवारी जाहिर केली. विशेष म्हणजे सातारा लोकसभा निवडणूकीसाठी यापूर्वी कधीही उदयनराजे भोसले यांना किंवा त्या घराण्याशी संबधित व्यक्तीला आतापर्यंत निवडणूकीतील उमेदवारीसाठी ताटकळत ठेवले नव्हते. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणूकीसाठी उदयनराजे भोसले यांना भाजपाने बराचकाळ ताटकळत ठेवण्यात आल्याची चर्चा राज्याच्या राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

उदयनराजे भोसले यांनी २०१९ च्या निवडणूकीनंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी रितसर भाजपात प्रवेश केला. त्यामुळे उदयनराजे भोसले यांना भाजपाने राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविले. परंतु लोकसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु होताच पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांनी सातारातून लोकसभेसाठी भाजपाकडे संधी मागितली. मात्र सातारामधून भाजपाकडून संधी मिळण्याची शक्यता फारच कमी होती. तसेच सातारा जिल्ह्यात शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शरद पवार यांच्या प्रभाव क्षेत्राखाली असलेल्या सातारा मतदारसंघ खेचून घेणे हवं तितकं सोपे नाही.

तरीही उदयनराजे भोसले हे सातारातून उमेदवारी मिळावी याकरिता तीन ते चार दिवस दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीसाठी ठाण मांडूण बसले. तरीही अमित शाह यांनी उदयनराजे भोसले यांना भेटीसाठी वेळ दिली नाही. अखेर महाराष्ट्रातून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्रातून पुन्हा दिल्लीत जाऊन उदयनराजे भोसले यांची भेट घेत त्यांना उमेदवारीचे आश्वासन दिले. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनीही सातारा शहरात आगामन करताना जसे की त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहिर करण्यात आलेली आहे या थाटातच प्रवेश केला. त्यानंतर १० दिवस झाले तरी त्यांना उमेदवारी भाजपाने जाहिर केली नाही. त्यामुळे उदयनराजे भोसले यांची राजकिय कुंचबना होत असल्याचे दिसून आले.

अखेर भाजपाने आज उत्तर प्रदेश, पंजाब मधील उमेदवारांची यादी जाहिर करत सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांचे नावही उमेदवारी यादीत जाहिर केले. त्यामुळे शरद पवार यांचे खंदे समर्थक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याशी लढत होणार आहे.

सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर आणि अनेक विधानसभा मतदारसंघावर शरद पवार यांची व्यक्तीशः पकड आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात आजही शहर आणि जिल्ह्यात शरद पवार यांचाच शब्द चालतो. यंदाच्या लोकसभा निवडणूकीसाठी शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे उदयनराजे भोसले यांची थेट लढत शशिकांत शिंदे यांच्याशी होणार आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *