Breaking News

आदित्य ठाकरे म्हणाले, गद्दारांचं सरकार फार काळ टिकणार नाही आदित्य ठाकरेंचे आव्हान, हिम्मत असेल तर राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेच्या दुसरा टप्पा सुरू आहे . आज ही यात्रा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात दाखल झाली, यावेळी पाटणतालुक्यात या यात्रेकरिता शिवसैनिक आणि सातारकर नागरिकांनी अभूतपूर्व गर्दी करत, आदित्य ठाकरे यांना आपला पाठिंबा असल्याचं दाखवून दिलं. या गर्दीने गद्दारांना क्षमा नाही, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी आपण उभे असल्याचं वचन हात वर करून आदित्य ठाकरे यांना दिलं .

शिव संवाद यात्रे दरम्यान पाटण तालुक्यात जागोजागी आदित्य ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यासाठी सातारकर शिवसैनिक आणि नागरिक रस्त्यावर उतरले होते . आपले आशीर्वाद देत होते . या प्रचंड जनसमुदायाला युवासेना प्रमुखांनी मार्गदर्शन घेऊन आपले आशीर्वाद पाठीशी राहुद्यात अशी साद घातली .

या मार्गदर्शना दरम्याम शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांचा खरपूस समाचार आदित्य ठाकरे यांनी घेतला . महाराष्ट्रात शिवसेना फोडण्याच राजकारण सुरू आहे, ठाकरे परिवार एकट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, नागरिकांची एकजुट, हिंदुत्वची एकजूट, शिवसैनिकांची एकजूट, हिंदूंची एकजूट तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे . पण हे कोणाला शक्य होणार नाही, कारण शिवसेना आणि ठाकरे परिवार वेगळं नाही आणि ते तुमच्या रूपाने एकजूट आहे , असेही ते म्हणाले.

तसंच राज्यपालांनी केलेलं विधान चुकीचं आहे, या महाराष्ट्राने तुम्हाला मान सन्मान दिला, त्या मातीबद्दल, शिवराय आणि सावित्री बाईंबद्दल बोलता , निवडणुका होतोयत तिथे वातावरण खराब करू पाहताय, पण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे . ते कोणी करू शकत नाही . असा सज्जड दम देखील विरोधकांना भरलाय . तसेच गद्दारी करून बनवलेल हे सरकार घटनाबाह्य आणि गद्दारांचं सरकार आहे आणि ते फार काळ टिकणार नाही, आणि हिम्मत असेल तर राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा असं आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी गद्दारांना केलं आहे .

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *