Breaking News

उध्दव ठाकरेंचा पलटवार, मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला पण तुम्ही दिल्लीसमोर… चोर वृत्तीला मतदान करून नका

भाजपा आणि एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांकडून कोरोना काळात उध्दव ठाकरे घराच्या बाहेर पडत नव्हते अशी जहरी टीका सातत्याने करण्यात येत आहे. या टीकेला खेड मधील सभेत प्रत्युत्तर देताना उध्दव ठाकरे म्हणाले, मी शून्य आहे. माझ्यामागे बाळासाहेब आहेत, म्हणून मला किंमत आहे. पण, गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल, बंगालमध्ये सुभाषचंद्र बोस आणि इकडे बाळासाहेब चोरले. या चोर वृत्तीला मतदान करणार का? असा सवाल करत २०२४ साली स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसलेला पक्ष गाडून टाकायचा आहे, हा निश्चय करा. नाहीतर २०२४ नंतर आपल्या देशात लोकशाही शिल्लक राहणार नाही, असा इशारा देत पुढे म्हणाले, मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला पण दिल्लीसमोर मुजरे करून आणि गुवाहाटीला जाऊनही महाराष्ट्र सांभाळता येईना असा पलटवार शिंदे गट आणि भाजपावर केला.
तुम्ही आमचं चोरलेलं धनुष्यबाण घेऊन निवडणूकीत उतराच मी माझी मशाल घेऊन उतरतो बघु तुम्हाला शिवधनुष्य पेलतय का असे खुले आव्हानही उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाला यावेळी दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला, पण तुम्ही दिल्लीसमोर मुजरे करत बसलात. माझ्याबरोबर महाराष्ट्र होता. आपलं जागतिक कौतुक झालं, ते माझं नाही महाराष्ट्राचं कौतुक होतं. गुजरातच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील उद्योग पळवले. फक्त तुटलेल्या एसटीवर गतिमान महाराष्ट्राची जाहीरात करतात. यांना शरम नाही.

त्यांना भगव्याचे तेज संपवायचे आहे. मी हवा की नको हे जनता ठरवेल निवडणूक आयोग नाही. मिंधेंच्या हातात धनुष्यबाण तरीही चेहरा पडलेला आहे. पण, ‘मेरा खानदान चोर है,’ हे कधीच पुसलं जाणार नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केली.
यांच्यात असे अनेक आहेत, ज्यांनी बाळासाहेबांना पाहिलं नाही. मात्र, आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगतात. बाळासाहेबांचे विचार नोकरी, उद्योग बाहेर जाऊ देण्याचे नव्हते. एक काळी टोपी वाला होता, आता गेला. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला. तरीही गद्दारांच्या शेपट्या आतच. हे बाळासाहेबांचे विचार नव्हते, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केला आहे.

शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या नाही, तर माझ्या वडिलांनी केली. हा सत्तेचा गुलाम झालेला चुना लाव आयोग आहे. भुरटे, गद्दार आणि तोतयांना सांगतोस नाव चोराल, पण शिवसेना चोरू शकत नाही. भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं. ज्यांनी सोबत दिली, त्यांना संपवायला निघाले आहेत. मात्र, त्यांनी प्रयत्न करुन बघावेत, असे आव्हान शिवसेना ( ठाकरे गट ) प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

खेडमधील गोळीबार मैदानात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मैदानाचे नावं चांगलं आहे, गोळीबार मैदान. पण, ही ढेगणं चिरडायला गोळीबाराची गरज नाही. तुमचे एक बोट मतदानाच्या दिवशी यांना संपवेल. ज्यांना आपलं कुटुंबीय मानलं, त्यांची आपल्यावर वार केले, अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

यांच्यात असे अनेक आहेत, ज्यांनी बाळासाहेबांना पाहिलं नाही. मात्र, आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगतात. बाळासाहेबांचे विचार नोकरी, उद्योग बाहेर जाऊ देण्याचे नव्हते. एक काळी टोपी वाला होता, आता गेला. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला. तरीही गद्दारांच्या शेपट्या आतच. हे बाळासाहेबांचे विचार नव्हते,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केला आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *