Breaking News

जयंत पाटील म्हणाले, या पाच जागा महाविकास आघाडी एकदिलाने लढविणार महाविकास आघाडीची बैठक पार पडली; पाचही जागांवर एकमत...

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूकीची कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूकीसाठी भाजपा आणि शिंदे गटाकडून कोकण आणि नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारही जाहीर केले. यापार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज दुपारी बैठक झाली.

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, विधान परिषदेच्या पाच जागा लढविण्याबाबत आघाडीमध्ये निर्णय झाला असून या जागा एक दिलाने लढविणार आहे.

मराठवाडयाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर नागपूरची जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, कोकणातील जागा शेतकरी कामगार पक्ष व अमरावती व नाशिक कॉंग्रेस लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली.

महाविकास आघाडीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आज पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी विधानपरिषदेच्या पाचही जागा महाविकास आघाडी एकत्रित व एकदिलाने लढवणार असल्याचे स्पष्ट केले.

आज मराठवाड्याचा व नागपूरचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून उद्या अमरावतीचा अर्ज दाखल करणार आहे. या बैठकीमध्ये इतर पक्षांनी जे अर्ज दाखल केले आहेत त्या सर्वांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेस आमदार वजाद मिर्झा, माजी आमदार व कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी उपस्थित होते.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *