Breaking News

अजित पवारांनी पुन्हा केला गौप्यस्फोट, बाळासाहेब थोरातांनी दिला गटनेते पदाचा राजीनामा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना थोरातांना विचारल्यानंतर त्यांनीच माहिती दिल्याचा केला दावा

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरू झालेला काँग्रेस पक्षांतर्गत संघर्ष आणखी चिघळला असून सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीवरून आणि सत्यजीत तांबेच्या विजयाचे भाकित करणारे याशिवाय सत्यजीत तांबे हे भाजपासोबत जाणार नसल्याचे आणि शिवसेनेतील बंडाच्या माहितीचा गौप्यस्फोट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट पुन्हा एकदा करत राज्याच्या राजकारणावर पवार घराण्याची सत्ता अबाधित असल्याचे एकप्रकारे अप्रत्यक्ष दाखवून दिले.
अजित पवार यांनी आणखी एकदा केलेल्या गौप्यस्फोटामुळे काँग्रेस अंतर्गत असलेला राजकिय सुंदोपसंदी बाहेर आली. तसेच राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजल्याचे दिसून येत आहे.

अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळविल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले. या सगळ्या घडामोडींवर आपल्या आजारपणामुळे काहीसे बाजूला राहिलेले काँग्रेस नेते तथा सत्यजीत तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथील एका कार्यक्रमासाठी ऑनलाईन माध्यमातून बोलताना काँग्रेस पक्षांतर्गत राजकारणावर भाष्य करत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपध्दतीबाबत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिल्याचे सांगितले. मात्र काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. मात्र अजित पवार यांनीच बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याचे बाळासाहेब थोरोत यांनीच फोनवरून सांगितल्याचे जाहिर करताच काँग्रेसमधील खदखद चव्हाट्यावर आली.

याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थोरातांबरोबर फोनवर झालेल्या चर्चेची माहिती दिली. ते मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी नाशिक निवडणूकीत नाट्यावर बोलताना पुण्यात माध्यमांशी बोलताना होते. त्यावेळी त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

अजित पवार म्हणाले, बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला अशी बातमी मी माध्यमांमध्ये पाहिली. मी त्यांना आज वाढदिवसानिमित्त फोन केला होता. त्यावेळी मी म्हटलो की, बाळासाहेब आज तुमचा वाढदिवस आहे. आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं या शुभेच्छा. मात्र, एक बातमी आहे आणि त्याविषयी आज तुम्हाला विचारावं की नको हे मला कळत नाही. कारण आज तुम्ही गडबडीत असाल. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, दादा, मी राजीनामा दिलेला आहे. तो माझा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा निर्णय घेईन, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *