Breaking News

आदित्य ठाकरेंनी घराणेशाहीसह भाजपावर टीका करताना म्हणाले, डिपॉझिट जप्त तर… गोव्यातील पत्रकार परिषदेत केली भूमिका स्पष्ट

मराठी ई-बातम्या टीम

गोवा विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस राहीलेले असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधत म्हणाले की, जर आमचे डिपॉझिट जप्त होणार आहे ना? मग आमच्यावर टीका कशाला करता? आमच्याबद्दल बोलता कशाला असा खोचक सवाल करत ते घराणेशाही बद्दल बोलताना पुढे म्हणाले, घराणेशाहीविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा एकच बघायला हवं की त्या व्यक्तीला काम करण्याची आवड आहे का? खरंच त्यान काम केलं आहे का? किती वर्ष काम केले आहे? ते लोकांसोबत कसे वागतात? त्यांच कर्तृत्व काय? हे बघायला हवं असेही ते म्हणाले.

पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एकमेकांवर हे टीका करत आहेत. पण लोकांना माहिती आहे की काय करायचं आहे”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी आदित्य ठाकरेंनी गोव्यात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाला खोचक शब्दांत सवाल केला आहे. गोव्यात शिवसेना ११ जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र, शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझिट देखील जप्त होईल, अशी टीका भाजपाकडून केली जात असताना त्याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले.

जर कुणाला आमचा पक्ष इतकाच कमकुवत वाटत असेल, आमचे डिपॉझिट जप्त होणार असं वाटत असेल, तर मग आमच्यावर टीका कशाला करता? आमच्याबद्दल बोलता तरी का? भिती कसली वाटतेय? होऊ दे प्रचार असे आव्हानही त्यांनी यावेळी भाजपाला दिले. आमची जेव्हा भाजपासोबत युती होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची ही भावना होती की मित्रपक्ष असेल, तर मैत्री स्वच्छपणे पुढे न्यायला हवी. कुठेही आपल्या मित्राला धोका निर्माण व्हायला नको. त्यांना मदत म्हणून आम्ही इतर राज्यात लढायचो नाही. गेल्या ५ वर्षांत आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. एनडीएमधल्या इतर पक्षांच्या पाठीत देखील खंजीर खुपसला गेल्याची खोचक टीका त्यांनी भाजपावर केली.

इथून पुढे आम्ही प्रत्येक निवडणूक लढवणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर करत गोव्याच्या प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा असणार आहे असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेनेकडून गोव्यात फक्त ११ जागा लढविण्यात येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून १३ ठिकाणी आपले उमेदवार उभे करण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी शिवसेनेवर टीकेची झोड उठविली जात आहे.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *