Breaking News

मंत्रिमंडळ विस्ताराआधीच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून बंडखोरांचे मंत्रीपद जाहिर (फोटो बघाच) राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने बंडखोरांवर टीका करण्यात येत आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात दौरा करत बंडखोरांच्या विरोधात चांगलेच रान माजविले. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सध्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील औरंगाबादच्या दौऱ्यावर गेले. मात्र औरंगाबादमध्ये असताना ते मध्येच दिल्लीला रवाना झाले आहेत. मात्र यातील काही सभांमध्ये शिंदे गटातील समर्थक आमदार असलेल्या दादाजी भुसे यांचा उल्लेख चक्क कृषी मंत्री म्हणून तेथील कार्यक्रमामधील स्टेजच्या बॅनरवर करण्यात आला. त्यामुळे अधिकृत मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधीच शिंदे गटातील आमदारांचा मंत्री म्हणून उल्लेख सुरु केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आज दुपारी औरंगाबादला पोहचत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीहून बोलावणे आल्याने त्यांनी औरंगाबादेतील सभा आटोपती घेत दिल्लीला प्रयाण केले. एका महिन्यातील त्यांचा हा सहावा दिल्ली दौरा आहे. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दादाजी भुसे यांचा कृषीमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला असल्याने बंडखोर आमदारांना जी मागील काळात खाती होती. तीच खाती या सत्तांतरानंतर ही कायम राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यात सत्तांतर होऊन साधारण एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. याच मंत्रिमंडळ विस्तारावर मागील काही दिवासांपासून भाजपाचे दिल्लीमधील वरिष्ठ नेते आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरु आहे. शिंदे महिन्याभरात आतापर्यंत एकूण पाच वेळा दिल्लीला जाऊन आले आहेत. असे असताना आजदेखील ते औरंगाबादचा दौरा आटोपून पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर निघाले आहेत. शिंदेंच्या या दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ होण्याची शक्यता आहे. तसेच या दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराचाही तारीख निश्चित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जातंय. राज्यात सध्या दोन मंत्र्यांचे सरकार आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे येत्या ३ ऑगस्टपूर्वी राज्यात नक्की मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

(बातमीच्या वर लावण्यात आलेल्या फोटोमधील स्टेजवरील बॅनर पाहिल्यास त्यावर दादाजी भुसे यांचा उल्लेख कृषी मंत्री म्हणून करण्यात आलेला आहे.)

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *