राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक आहे. कुटुंबप्रमुख म्हणून मला विचाराल तर आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरोधात उभा होता. अजित पवारांच्या पत्नी माझ्या मुलीच्या विरोधात उभ्या होत्या. राजकारणात आम्ही कुटुंब आणत नाही तर आमची विचारधारा आणतो अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मांडली.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, कृषी क्षेत्राची परिस्थिती आज बदलली आहे. लोकसंख्या जास्त होत असताना शेती कमी होत आहे. विकास कामांसाठी शेतीची जमीन घेतली जाते. दिवसेंदिवस जमीन कमी-कमी होत आहे. त्यातून शेतीवर बोजा वाढला. तो बोजा कमी करण्याची गरज आहे. घरातील दोनपैकी एका मुलाने शेतकरी केली पाहिजे. उत्पादन व खर्चाचा विचार होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, हीच शासनाची भूमिका असावी अशी अपेक्षा व्यक्त करत कर्जमाफीबद्दल घोषणा प्रत्यक्ष कृती नाही अशी खंतही यावेळी व्यक्त केली.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, तसेच, गेल्या तीन वर्षापासून कृषी क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाचा अभ्यास करीत आहे. एआय तंत्रज्ञानातून कृषी समस्यावर तोडगा काढू शकतो. एआय तंत्रज्ञानातून केळीचे अद्भूत उत्पादन घेता येते. ऊसामध्ये हे तंत्रज्ञान वापरले. पिकांमध्ये मोठी सुधारणा झाली. महाराष्ट्रात सुदैवाने चार कृषी विद्यापीठे आहेत. कापूस, सोयाबीनसाठी एआय तंत्रज्ञान वापरावे. त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. कष्टकरी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व अर्थसहाय्य देण्याची गरज आहे. सेंद्रिय शेतीतून मिळणारे उत्पादन महत्वाचे आहे. उत्पादन खर्च व बाजारातून मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ साधता येण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगितले.
शरद पवार म्हणाले की, प्रशासन, राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक आहे. कुटुंबप्रमुख म्हणून मला विचाराल तर आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरोधात उभा होता. अजित पवारांच्या पत्नी माझ्या मुलीच्या विरोधात उभ्या होत्या. राजकारणात आम्ही कुटुंब आणत नाही तर आमची विचारधारा आणतो असेही यावेळी स्पष्ट केले.
पार्थ पवार यांच्या जमिन घोटाळ्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, याबद्दल मला काही सांगता येणार नाही. पण हा गंभीर विषय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जर मुख्यमंत्रीच हा गंभीर विषय असल्याचे सांगत असतील तर त्यासंबंधी चौकशी करून त्याचे वास्तव चित्र समाजासमोर ठेवले पाहिजे. राज्य सरकारने यावर चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यामुळे या समितीच्या अहवालातून कोणत्या बाबी समोर येतात, ते पाहिले पाहिजे. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेल्या मतांबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, ते कदाचित तीचे वैयक्तीक मत असेल असेही यावेळी स्पष्ट केले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार म्हणाले की, व्हीव्हीपॅट प्रणालीद्वारे मतदान झाल्यास शंका राहणार नाही. मतदारांचा विश्वास टिकवण्यासाठी ही प्रणाली अधिक पारदर्शक आहे. तसेच, मनसेसोबत संभाव्य युतीच्या चर्चेबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की, मनसे संदर्भात महाविकास आघाडीने एकत्र बसून निर्णय घ्यावा. या मुद्द्यावर कोणतीही घाई न करता सविस्तर चर्चा होईल असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya