Breaking News

जयंत पाटील यांचा पंतप्रधान मोदींना टोला, नोटबंदीचा दुखवटा अजून सरला नाही

देशात निर्माण होणाऱ्या काळा पैस्याला आळा घालण्यासाठी ११ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत देशात नोटबंदी जाहीर केली. या नोटबंदीमुळे रोजच्या आवश्यक जगण्यासाठीही नागरीकांना पैसे राहिले नाहीत. तसेच स्वत:जवळच्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बदलण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांना हातातील कामे बाजूला ठेवत बँकेच्या रांगेत उभा रहावे लागले. या रांगेत तासोनतास ताटकळत उभारल्याने जवळपास पाचशेहून अधिक नागरीक मृत्यूमुखी पडले. तसेच अनेक-छोट्या मोठ्या व्यवसाय आणि व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला. या नोटबंदीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आजच्या दिवशी २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर करून देशातील स्थिर अर्थकारणाची हत्या केली. आज सहा वर्ष सरली तरी दुखवटा मात्र सरला नाही. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस ‘नोटाबंदीला श्रद्धांजली’ वाहण्याचे राज्यव्यापी आंदोलन करणार आहे असल्याचे ट्वीट करत दिली.

लोकांचे दरडोई उत्पन्न जे २०१६-१७ मध्ये ८.२ टक्के होते ते २०२०-२१ मध्ये -७.३ टक्के झाले आहे. नोटबंदीमुळे सुमारे ३ कोटी लोकांनी आपली नोकरी गमावली. सध्याचा बेरोजगारीचा दर ७.७७ टक्के इतका वाढला आहे. महाराष्ट्रातील सुमारे ८० हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय २०१६ पासून कायमचे बंद झाले आहेत अशी धक्कादायक माहितीही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये दिली.

मध्यमवर्गीयांच्या संसाराचा गाडा कसाबसा पुढे रेटला जातोय…आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही नोटबंदीला श्रद्धांजली वाहून आम्ही अच्छे दिनाची वाट पाहतो आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *