Breaking News

देशाच्या पहिल्या आदिवासी तर दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून द्रोपदी मुर्म ३ लाख मतांच्या फरकाने विजयी

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल २५ जुलै २०२२ रोजी पूर्ण करत आहेत. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीसाठी देशात सोमवारी मतदान पार पडले. तसेच आज त्याची मतमोजणी करण्यात आली. रात्री ८.३० वाजेपर्यत मतमोजणी करण्यात आले असता जवळपास द्रोपदी मुर्म यांना ५ लाख ७७ हजार मते पडली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार यशवंत सिन्ंहा यांना २ लाख मते पडली. एकूण मतदानापैकी ५० टक्के मते द्रोपदी मुर्म यांना पडल्याचे सांगण्यात येत असल्याने देशाच्या दुसऱ्या महिला तर पहिल्या आदीवासी महिला राष्ट्रपती पदी विराजमान होत आहेत.

या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा पराभूत झाले आहेत. या निवडणुकीसाठी ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले होते. राष्ट्रपतीपदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मुर्मू आघाडीवर होत्या. तिसऱ्या फेरीपर्यंत मुर्मू यांना वैध मतांपैकी ५० टक्के मते मिळाली.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अधिकाधिक पाठिंबा मिळावा म्हणून मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांनी देशभर दौरे केले होते. मात्र या निवडणुकीमध्ये मुर्मू यांचा विजय झाला. या विजयासह मुर्मू यांना देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे. त्या येत्या २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारतील. याआधी प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता.

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीपासूनच द्रौपदी मुर्मू आघाडीवर होत्या. मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत त्या ८१२ मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. मुर्मू यांना दुसऱ्या फेरीपर्यंत १३४९ मते मिळाली. या मतांचे मूल्य ५ लाख ७७ हजार आहे. तर दुसऱ्या फेरीपर्यंत सिन्हा यांना ५३७ मते मिळाली होती. या मतांचे मुल्य २ लाखाहून अधिक आहे.

राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत देशभरातील एकूण १७ खासदारांची मतं फुटली आहेत. या खासदारांनी एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केले. परिणामी मुर्मू शेवटपर्यंत आघाडीवर राहिल्या आणि त्यांचा विजय झाला.

Check Also

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *