Breaking News

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, संजय राऊत खोटं बोलतायत

काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यामध्ये १० जागांवरून मतभेद आहेत, त्या जागा काँग्रेसही मागत आहे आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) मागत आहेत. त्यांच्या अनेक चर्चा झाल्या पण ते एकमेकांना जागा सोडायला तयार नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

सध्या प्रकाश आंबेडकर हे अमरावतीच्या दौऱ्यावर असून तेथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ५ जागांवर शिवसेना (उध्दव ठाकरे), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस यांच्यात जागावाटप होत नाही. एकही जण जागा सोडायला तयार नाहीत. संजय राऊत माध्यमांशी खोटं बोलतात की, वंचित बहुजन आघाडीने आमच्याकडे जागाच मागितल्या नाहीत, असा खुलासाही जागा वाटपाच्या चर्चेवरील आरोपाला उत्तर देताना केला.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तसेच, भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रातून घालवणे हे काँग्रेसचे प्राधान्य आहे की, आपला पक्ष वाढवणे याला प्राधान्य आहे याचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे असा सूचक इशारा देत मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. नवनीत राणा मोठी फसवी व्यक्ती आहे. राणांचे जात प्रमाणपत्र बोगस असून, काही दिवसात त्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे. त्यामुळे त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी असा इशाराही यावेळी दिला.

वंचितने यापूर्वीच काँग्रेस मविआकडे जागांवर चर्चेसाठी वंचितने दिला प्रस्ताव

लोकसभेच्या निवडणुकीची तारीख आता कधीही जाहीर होऊ शकते. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी १० मार्चला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेले पत्र एक्स हॅंडलवर टाकले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने एकत्र बसून ती काँग्रेसच्या मनात असलेल्या आणि मविआमध्ये मागणी केलेल्या सर्व जागांवर चर्चा करावी, असा प्रस्ताव मांडल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले.

पुढे प्रकाश आंबेडकर आपल्या पत्रात म्हणाले की, निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यात काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यातील सहमतीचा अभाव आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम होत नसल्याने हे लक्षात घेऊन मी ९ मार्चला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशी संपर्क साधला होता.

तसेच प्रकाश आंबेडकर पत्रात म्हणाले की, आमचं फोनवर विस्तृत बोलणं झालं. चेन्निथलाजी यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) किमान १८ जागांवर ठाम असल्याच्या मुद्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली असल्याचेही म्हटल्याचा उल्लेख आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने एकत्र बसून काँग्रेसच्या मनात असलेल्या आणि मविआमध्ये मागणी केलेल्या सर्व जागांवर चर्चा करावी, असा प्रस्ताव मांडला असल्याचे आंबेडकर म्हटले आहे. तसेच, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात याविषयी आपल्याला सांगतील असे आश्वासन फोनवर दिले. मात्र, आतापर्यंत बाळासाहेब थोरात यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद नसल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात नमूद करत पुढे म्हणाले की, मला आशा आहे की, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी लवकरच एकत्र बसतील जेणेकरून आम्ही भाजप-आरएसएसचा पराभव करण्यासाठी पुढे जाऊ शकू असेही स्पष्ट केले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *