Breaking News

सुप्रिया सुळे म्हणाल्या, दोन्ही छत्रपतींनी भूमिका घेतलेली आहे त्यानुसार..

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण अद्यापही तापलेलं आहे. मात्र भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांकडून त्याचबरोबर शिंदे गटाकडूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरील कारवाईची म्हणावी तशी मागणी होत नाही. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मात्र राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या सगळ्या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, दोन्ही छत्रपतींनी भूमिका घेतलेली आहे. संजय राऊत, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी सगळ्यांनी जी भूमिका घेतली आहे, त्याचं मी स्वागत करते. ज्या पद्धतीने सातत्याने भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष जी पाठराखण अशा लोकांची करताय, त्याचा मी जाहीर निषेध करते. मला असं वाटतं राजकारण कधीतरी बाजूला ठेवून स्वत:च्या स्वाभिमानासाठी आणि ज्या छत्रपतींचं नाव घेऊन महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे. जो आपला श्वास आहे, ध्यास आहे आपला आदर आहे, ओळख आहे. त्यांच्या मानसन्मासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मी राज ठाकरेंचंही भाषण ऐकलं. त्याचंही मी स्वागत करते, त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपण सगळ्यांनी लढण्याची गरज आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी जी घसरते आहे, त्याबद्दल सगळ्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मी अनेकदा आमच्या विरोधकांनाही विनंती केली आहे, की आपण सगळे एकत्र मिळून महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे जी अनेक दशकं आपल्या ज्येष्ठांनी जपलेली आहे. ती कुठेतरी ढासळताना दिसते आहे, सुसंस्कृत पणा जो आधी होता तो परत आणण्याचा प्रयत्न करूयात असंही यावेळी त्या म्हणाल्या.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *