Breaking News

मोदी सरकारचा ठेका पध्दतीचा निर्णय ‘संघाचा हेर’ मंत्रालयात बसवण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी

प्रशासकीय सेवेत अधिकाऱ्यांची ठेका पध्दतीने भरती करण्याचा मोदीसरकारने घेतलेला निर्णय कुठेतरी संघाचा हेर मंत्रालयामध्ये बसवण्यासाठी आहे. देश लुटण्यासाठी संघाला थेट युपीएससीच्या माध्यमातून तिकडे जाता येत नाही. त्या विशेष जागेवर बसवता येत नाही. त्यासाठीच या सरकारने हा नवीन मार्ग शोधला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी  बोलताना केला.

प्रशासकीय सेवेतील सेक्रेटरी लेवलच्या अधिकाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ठेका पध्दतीवर तो नियमबाह्य आहे. भारतीय घटनेच्या नियम ३१२ अंतर्गत सरकारी भरती करण्याची नियमावली तयार केल्याशिवाय त्याला लोकसभेमध्ये मंजुरी घेतल्याशिवाय थेट भरती करता येत नाही असेही ते म्हणाले.

ज्याप्रकारे मोदीसाहेब ठेका पध्दतीवर ते अधिकारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे जी आरक्षणे आहेत त्यामध्ये शेडयुलकास्ट, शेडयुलट्राईब,ओबीसींना देण्यात आलेली आहेत. त्यांची जागापण त्यामुळे कमी होणार आहे. या निर्णयामुळे जर एखादा अधिकारी ठेका पध्दतीवर भरती झाली तर तो सरकारी नोकर होत नाही. त्याला अन्टीकरप्शनची, भ्रष्टाचाराचे जे वेगवेगळे कायदे या देशात आहेत तेपण लागू होत नाही.

याआधी गुजरातमध्ये याचपध्दतीने कारभार सुरु केला होता. महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस सरकारने कारभार सुरु केलेला आहे. म्हणजे मागासवर्गीय, दलित, आदिवासी, ओबीसी यांचे हक्क मारणे, संघाचे हेर बसवणे आणि त्यांना उत्तर देण्यास किंवा त्यांना कोण जाब विचारु शकत नाही. त्यांची अकाऊंटबिल्टी राहणार नाही. त्यामुळे या पध्दतीचा निर्णय देशाला घातक आहे. यासाठी सर्व लोकांनी याच्याविरोधात एकजुट होवून लढत देण्याची गरज आहे आणि निश्चितरुपाने लोक याविरोधात कोर्टात धाव घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केले.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *