Breaking News

शरद पवारांची रणनीती बीडमध्ये निष्प्रभ ठरल्याने सुरेश धस विजयी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना लगाम

बीड : प्रतिनिधी

विधान परिषदेसाठीच्या बीड-लातूर आणि उस्मानाद जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील जागेसाठी झालेल्या निवडणूक राज्याच्या दृष्टीने औस्तुक्याचा विषय ठरली. ही जागा निवडूण आणण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाचे उमेदवार अशोक जगदाळे यांना भाजपचे उमेदवार सुरेश धस यांच्या विरोधात निवडूण आणण्यासाठी मोठी रणनीती आखली. परंतु पवार यांच्या रणनीतीला निष्प्रभ ठरवित बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना निवडूण आणले.

बीड-लातुर -उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी २१ मे रोजी मतदान झाले होते. मतदानानंतर काही मतदात्यांना मोठ्या प्रमाणावर “लक्ष्मीदर्शन” केल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. यामुळे या निवडणूकीच्या निकालाबाबत राज्यात उस्तुकता वाढली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशनानुसार तब्बल बावीस दिवसांनी आज सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली. त्यात एकूण १००५ मतदारांपैकी १००४ मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यापैकी मत मोजणीनंतर सुरेश धस यांना ५२७ तर जगदाळेंना ४५१ मते मिळाली. २५ मते बाद ठरविण्यात आली तर एका मतदाराने नोटासाठी मतदान केले. भाजपचे सुरेश धस यांचा ७६ मतांनी दणदणीत विजय झाला.

भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या रमेश कराड यांनी आयत्यावेळी भरलेला उमेदवारी अर्ज माघारी घेत पुन्हा भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मुळ राष्ट्रवादीचे असलेले मात्र अपक्ष असलेल्या अशोक जगदाळे यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा देत त्यांच्या विजयासाठी निश्चित करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी स्वत: शरद पवारांनी लक्ष घालून जगदाळे यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. मात्र सुरेश धस यांच्या विजयाने पंकजा मुंडे यांची रणनीती यशस्वी तर शरद पवार धनंजय मुंडे यांची रणनीती अपयशी ठरल्याचे दिसून येते.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *