Breaking News

बारसूवरून देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, कुणाची सुपारी घेऊन विरोध करताय ते तरी सांगा ? जामनगरमध्ये रिलायन्सची रिफायनरी असून तेथे चांगल्या दर्जाचे आंबे

जनतेने हे पाहिलं आहे की मोदीजींसोबत मिळून जे मुख्यमंत्री काम करतात त्या राज्याचा विकास होतो. महाराष्ट्रातही डबल इंजिन सरकार आहे. विकासाच्या मार्गाने आपण पुढे जात आहोत. कर्नाटकात भाजपाचं बहुमताचं सरकार येईल याची मला खात्री वाटते. एक्झिट पोलचे आकडे काहीही सांगू द्या मात्र आम्ही एक्झिट पोल्सना मागे अनेकदा मागे टाकलं आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकात भाजपा जिंकेल असा दावा केला.  तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील बारसू या ठिकाणी जो प्रकल्प आणायचा आहे आणि त्यावर जो विरोध होतो आहे त्यावरही भाष्य करताना म्हणाले, कुणाची सुपारी घेऊन बारसूला विरोध करत आहात ते तरी सांगा? असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही जी रिफायनरी आहे त्यात केंद्र सरकारच्या तीन ऑईल कंपनीज एकत्रित येऊन देशाच्या इतिहासतली सर्वात मोठी गुंतवणूक करत आहेत. या गुंतवणुकीमुळे एक लाख लोकांना रोजगार कोकणात मिळणार आहे. मागच्या काळात नाणारलाही ही रिफायनरी करायचं ठरवलं तेव्हा श्रीमान उद्धव ठाकरेंनी या गोष्टीला विरोध केला. त्यानंतर त्यांच्याही हे लक्षात आलं उशिरा आलं पण आलं. त्यामुळे बारसूला रिफायनरी करा असं पत्र उद्धव ठाकरेंनी पाठवलं आता पुन्हा तेच विरोध करत आहेत, असा आरोपही केला.

तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोध करणाऱ्यांची संख्या छोटी आहे. तरीही आम्ही त्यांचा सन्मान करतो. ज्यांच्या मनात काही शंका असतील आणि जे खरे विरोधक असतील त्यांच्याशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत. भूमिपुत्रांवर कुठलाही अन्याय होणार नाही हा आमचा प्रयत्न असेल. पण त्याचवेळी राजकारणापुरतं जे विरोध करत आहेत त्यांचा विरोध सहन करणार नाही. या रिफायनरीमुळे मासे पकडता येणार नाहीत, आंबे पिकवता येणार नाही असंही सांगितलं गेलं. जामनगरला रिलायन्सची रिफायनरी आहे. तिथले आंबे हे निर्यात होतात. आपल्यापेक्षा जास्त चांगल्या दर्जाचे आंबे तिथे घेतले जातात. तिथे मासेमारी मोठ्या प्रमाणावर होते आहे. कुठेही पर्यावरणावर परिणाम झालेला नाही. तसाच तो आपल्याकडेही होणार नाही. आपण जी रिफायनरी आणतो आहोत ती ग्रीन रिफायनरी आहे. अशाही परिस्थिती खोटं बोलून, दिशाभूल करून किती मोठं नुकसान आपण करतो आहे हे उगाच विरोध करणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असा टोलाही लगावला.

तसेच प्रकल्पासाठी निवडलेल्या जमिनीवरून देवेंद्र फडणवीस म्हणाले, जी जमीन आपण निवडली आहे ती कातळ जमीन आहे. त्यातलं जे कातळ हेरिटेज आहे ते आम्ही सोडून दिलं आहे. मुंबईतून येऊन प्रकल्पाला विरोध करत आहेत. हे थांबलं पाहिजे. या महाराष्ट्राचं अतोनात नुकसान हे कधी आरेला विरोध करायचा, कधी पोर्टला विरोध करायचा, कधी समृद्धी महामार्गाला विरोध कर असा विरोध करून तुम्ही केलं आहेत असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

जे लोक विरोध करत आहेत त्यांना मला विचारायचं आहे की नेमकी कुणाची सुपारी घेऊन हा विरोध तुम्ही करत आहेत. बरं प्रकल्प बाहेर गेला की बोंब मारायची आणि प्रकल्प येत असेल तेव्हा विरोध करायचा. तिथे माध्यमांनी जाऊन पाहिलं जालियनवाला वगैरे सारखी स्थिती नाही. कुठल्याही गोष्टी न पाहता माईंडलेस पद्धतीने का करता? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

Check Also

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *