Breaking News

राजकारण

गुजरात विधानसभा निवडणूकीसाठी शिंदे-फडणवीस सरकारने दिली सुट्टी

गुजरात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राज्यातील पालघर, नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांना मतदानासाठी सुट्टी देण्याचा आदेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जारी केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीकरिता १ व ५ डिसेंबर २०२२ रोजी मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीमध्ये ज्यांची नावे …

Read More »

आदित्य ठाकरे निघाले बिहार दौऱ्यावर

शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीनंतर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राज्याचा दौरा केलेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आता एकदिवसीय बिहारच्या दौऱ्यावर उद्या बुधवारी जात आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय जनता दलाचे नेते तथा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भेट घेणार असल्याची माहिती उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने दिली. यावेळी आदित्य …

Read More »

राहुल गांधी यांनी भावनिक होत दिला महाराष्ट्रातील जनतेला संदेश

कन्याकुमारीहून सुरु झालेली भारत जोडो यात्रा मागील १४ दिवसांपासून महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातून प्रवास करत मध्य प्रदेशच्या दिशेने पुढे गेली. मात्र या १४ दिवसात महाराष्ट्रात मिळालेल्या अनुभवाच्या शिदोरीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भावनिक होत महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला. काय दिला संदेश महाराष्ट्रातील जनतेला वाचा त्यांच्याच शब्दात…. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा …

Read More »

ठाकरे गटात पुन्हा दोन तट

कोकणातील नियोजित रिफायनरी प्रकल्प नाणार येथे होणार होता. मात्र स्थानिक नागरीकांच्या रेट्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यास विरोध करत फडणवीस सरकारला नाणार येथून तो प्रकल्प रद्द करायला लावला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून रिफायनरी प्रकल्प बारसू येथे करण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु झाल्यानंतर उध्दव ठाकरे गटात पुन्हा दोन तट …

Read More »

साई रिसॉर्टचे पाडलेच नाही ! आता परबांचे सोमय्यांना खुले आव्हान

शिवसेना-ठाकरे गटाचे आमदार अनिब परब यांच्याशी संबंधित रत्नागिरीतील दापोली येथील साई रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने सांगितले जात होते. मात्र,सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्तास  कथित साई रिसॉर्टचे पाडकाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे. यावरून अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांनी खुले आव्हान दिले. याबाबत अधिक …

Read More »

भाजपा म्हणते, त्या एका वक्तव्यावरून राज्यपालांना कोंडीत पकडू नका

भारतीय जनता पार्टीचे १८ कोटी कोट्यवधी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन काम करतात व शिवरायांचे इतिहासातील महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, पीक विमा नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी लढा देणार

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे संपूर्ण खरीप उद्धवस्त झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्य़ाचे हप्ते भरले आहेत पण अद्यापही त्यांना शासकीय मदत किंवा पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. मोदी सरकारच्या आशिर्वादाने विमा कंपन्याकडून शेतक-यांची खुले आम लूट सुरू आहे. ती थांबवून शेतक-यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, बील भरले नाही म्हणून वीज कापू नका

कोविड काळानंतर राज्यातील अनेक भागात वीज बील भरणा केला नाही म्हणून कृषी पंपासह घरगुती वीज तोडणी मोहिम महावितरणने सुरु केली. त्यामुळे अनेक भागात वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे घटना सर्रास घडताना दिसून येत होत्या. त्यावर अखेर उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला आदेश देत वीज बील भरले …

Read More »

प्रकाश आंबेडकर- उध्दव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर भाजपा म्हणते, फरक पडत नाही

काल रविवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पहिल्यांदाच प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम या संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आले. तसेच एकत्र आल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना थेट प्रकाशजी आपल्या दोघांना मिळून या गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला बसावं लागेल चर्चा …

Read More »

राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे गटही नाराज

‘छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श झाले आहे’, असं विधान केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे प्रत्येक व्यक्तींना त्यांच्याबद्दल आदर असला पाहिजे’ असं म्हणत शिंदे गटाचे नेते राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. …

Read More »