Breaking News

राजकारण

उध्दव ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेना प्रत्युत्तर, मीच केलय…अरे नाही बाबा समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनानंतर ठाकरे यांनी केली शिंदेवर टीका

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून मोठा वाद चालू असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्रमक भूमिका मांडली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणतीच भूमिका मांडत नसल्याने विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतरही बसवरा बोम्मईंनी …

Read More »

समृध्दीच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य, प्रकल्प होऊ नये यासाठी प्रयत्न.. उध्दव ठाकरे यांचे नाव घेता केली टीका

नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृध्दी एक्सप्रेस वेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी झालेल्या जाहिर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पास विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधत सूचक विधान केले. त्यामुळे समृध्दी महामार्गावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रकल्पासाठी जमिन दे‌ऊ दिली नसल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री …

Read More »

देवेंद्र फडणवीसांनी “गोवा-नागपूर” एक्सप्रेस वे ची घोषणा करत “या” चार जणांचे केले कौतुक बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे उद्घाटन प्रसंगी केले कौतुक

बहुचर्चित बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथून १० किमी अंतरावर असलेल्या पहिल्या टोल नाक्यावरील वायफळ येथे झाले. त्यानंतर झालेल्या जाहिर कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोरच पुढील वेळी नागपूर-गोवा एक्सप्रेस वे चा असाच महामार्ग तयार करण्यात येणार असून हा महामार्ग विदर्भ, …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या आव्हानाला बगल देत पंतप्रधान मोदी म्हणाले, राजकारणात एक विकृती येतेय… बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने पूर्ण झालेल्या बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या महामार्गावर लागणाऱ्या लागणाऱ्या पहिल्या टोल नाक्यावर वायफळ येथे लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कर्नाटककडून सीमाप्रश्नी करण्यात येत …

Read More »

महाराष्ट्रातील दुसऱ्या वंदे भारत गाडीला पंतप्रधानांनी दाखविला झेंडा: वैशिष्टे काय या गाडीचे नागपूर-बिलासपूर दरम्यान धावणार ‘वंदे भारत एक्सप्रेस’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-बिलासपूर शहरांदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा  झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या गाडीमुळे या दोन्ही शहरांदरम्यान वेगवान रेल्वेगाडीचा पर्याय उपलब्ध झाला असून ही देशातील सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक …

Read More »

निर्भया निधीतील वाहने सरंक्षणासाठी; शिंदे टोळीतील आमदारांना नक्की कशाची भीती वाटते ? निर्भया निधीतील वाहने पोलीस स्टेशन्सला तात्काळ पाठविण्यात यावीत-जयंत पाटील यांची मागणी

निर्भया निधी महिलांची सुरक्षितता आणि महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने तयार केलेला निधी होता. मात्र या निधीतून घेतल्या गेलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात आहे. त्यामुळे ही वाहने तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी …

Read More »

अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत साधला चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा निधी काय कुणाच्या बापाचा आहे का? तो निधी सरकारचा आहे

मुंबईतील विकास कामांच्या शुमारंभावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना तीन वर्षे निर्णय न घेता स्थगिती देण्यातच वाया गेल्याची टीका केली. तसेच आम्हाला दोनच वर्षे मिळाल्याने आम्हाला टेन्विटी टेन्विटी खेळावी लागत असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत उच्च तंत्रशिक्षण …

Read More »

शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, हा भ्याडपणा हिंमत असेल तर समोर या अजित पवार, सुषमा अंधारे, उध्दव ठाकरेंनी निंदा करावी

पैठण येथील कार्यक्रमात भाजपाचे नेते तथा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वचस्तरातून टीकेचा भडीमार होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून एका अज्ञात व्यक्तीने आज चिंचवड गावात चंद्रकांत पाटील यांच्यावर …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, हेगडेवार-गोळवळकरांनी आजच्या भाषेत… नाव जरी नाही घेतले तरी खोक्यांनी पैसे घेतले

राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करत आधीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाच्या आमदारांनी राळ उठवून दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकिय वातावरण आधीच तापलेले आहे. त्यातच आता काल भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फुले-आंबेडकरांनी आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारणीसाठी भीका मागितल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरून सर्वचस्तरातून टीका होत आहे. …

Read More »

उध्दव ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना आव्हान, …मग खुशाल तुम्ही महामार्गाचे उद्घाटन करा पालकासारखे बोला नाहीतर पालकाची भाजी समजून बोलू नका

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकच्या या अरेरावीवर पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. पंतप्रधानांनी उद्याच्या कार्यक्रमात जरूर बोलावं. पण त्यांनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अरेरावी यावर बोललंच पाहिजे. आख्खा महाराष्ट्र तुमच्या कर्नाटकविषयीच्या भूमिकेची वाट बघतोय, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव …

Read More »