Breaking News

राजकारण

चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त विधान, फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळेसाठी भीक मागितली नव्या राजकिय वादाला सुरुवात

मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अवमानकारक वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात वादंग उठलं होतं. तसेच भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजी राजे यांनीही आक्रमक भूमिका घेतली. या वक्तव्यांच्या निषेधार्थ राज्यपालसह भाजपा विरोधात …

Read More »

लव्ह जिहादप्रकरणी महाराष्ट्रात कायदा? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली भूमिका इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास केल्यानंतर निर्णय

मागील काही दिवसांपासून भाजपा आमदारांकडून सातत्याने काही प्रेम प्रकरणांचा संबध लव्ह जिहादशी जोडत आहेत. तसेच या अनुषंगाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा करावा अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. नेमक्या याच परिस्थितीत पालघरच्या श्रद्धा वालकर हिचा खून दिल्लीत झाल्यानंतर या खून प्रकरणाची देशभर चर्चा सुरू झाली. त्यामुळे लव्ह …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, म्हणून मुख्यमंत्री कोणताच बाणेदारपणा दाखवत नाहीत शिवसेनेचे नाहीतच ते भाजपाचेच मुख्यमंत्री...

राज्यात घडणाऱ्या सगळ्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत जे काही आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीच बोलत आहेत. असा प्रकार महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही असे स्पष्ट करतानाच सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे, त्याच्या तारखा लागतील पण हे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत आणि महाराष्ट्राचे …

Read More »

पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला विविध लोकाभिमुख उपक्रमांचा शुभारंभ समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून देखील प्रवास करणार आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थित …

Read More »

त्या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांचा सवाल, आपले मुख्यमंत्री गप्प का? कन्नडींगाकडून ट्रकला पुन्हा काळ फासलं

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता आणखी विकोपाला गेला आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील वाहनावर कन्नड रक्षण वेदिका संघटने कडून दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापलं होतं. हे वातावरण निवळत असताना आज पुन्हा कर्नाटकातील गदग मध्ये महाराष्ट्रातील एका ट्रकवर काळे फासण्यात आल्याचा प्रकार समोर येताच शिवसेना युवानेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी …

Read More »

अजित पवारांचा पलटवार, त्या निर्णयाबाबत फडणवीस धांदात खोटं बोलतायत तो निर्णय महाविकास आघाडीने घेतलाच नाही

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार असताना १३ मार्च २०२०, ३ मार्च २०२१, २० मे २०२१, ९ डिसेंबर २०२१ ला एक शासन निर्णय काढला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारच्या काळात कर्नाटक बँकेत पगार काढण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला तो साफ चुकीचा आहे. कर्नाटक बँक निकषात बसत नव्हती. काल …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा टोला, आता कर्नाटकसाठी महाराष्ट्रातील गावे पळवणार का? गुजरातमधील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांकडून एकाबाजूला महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा सातत्याने अवमान केला जात आहे. तर दुसऱ्याबाजूला राज्यातील उद्योग पळवून नेले जात असताना कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्रातील गावांवर दावा केला जात आहे. या घडामोडींच्या विरोधात महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबर रोजी मोदी आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार …

Read More »

शरद पवार यांचा आरोप, मराठी बाहुल्य कमी कसे होईल यासाठी योजनाबध्द प्रयत्न कानडीचा द्वेष आम्ही करणार नाही

सीमाप्रश्न हा फार जुना प्रश्न आहेत. यात महाराष्ट्राची जी मागणी आहे तिला जनतेचा आधार आहे. आपण अनेक निवडणुकीमध्ये हा निर्णय लोकांचा आहे हे देशासमोर सिद्ध करू शकलो. अनेकदा याठिकाणी मराठी भाषिकांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर तरीही काही होत नाही हे पाहिल्यानंतर लोक नाउमेद होतात. अशी परिस्थिती सध्या सीमा भागात झाली आहे. …

Read More »

नाना पटोले म्हणाले, निवडणूक निकालाने भाजपाची उलटी गिनती सुरु… गुजरातमध्ये वारेमाप दारु, पैसा व सरकारी यंत्रणेचा गैरवापर

देशभरातील निवडणुकांचे निकाल काँग्रेस पक्षासाठी समाधानकारक आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपाचा पराभव करून विजयाची पताका फडकवली आहे. तर राजस्थान व छत्तिसगड विधानसभा पोट निवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. दिल्ली महानगरपालिका, हिमाचल प्रदेश व गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती पण आता फक्त गुजरातमध्येच त्यांना सत्ता राखता आली. निवडणूक निकालाने …

Read More »

गुजरातच्या निकालावर शरद पवार म्हणाले, हळूहळू बदल होतोय… म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही

गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल यामध्ये कोणाच्या मनात शंका नव्हती. सगळी देशाची सत्ता त्यासाठी वापरण्यात आली. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेण्यात आले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे येतील याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम गुजरातमध्ये एकतर्फी निकाल लागणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. गुजरात निकाल लागला म्हणजे देशात लोकांचा एका …

Read More »