Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, बील भरले नाही म्हणून वीज कापू नका

कोविड काळानंतर राज्यातील अनेक भागात वीज बील भरणा केला नाही म्हणून कृषी पंपासह घरगुती वीज तोडणी मोहिम महावितरणने सुरु केली. त्यामुळे अनेक भागात वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे घटना सर्रास घडताना दिसून येत होत्या. त्यावर अखेर उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला आदेश देत वीज बील भरले नाहीत म्हणून वीज न कापण्याचे आदेश दिले.

शेतकऱ्यांनी कृषीपंपाचे बिल भरले नाही म्हणून त्यांचे वीज कनेक्शन कापू नका. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून सध्याचे बिल घ्या. इतर वसूली नंतर करा अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत.

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी नेमण्यात आलेल्या उपसमितीची बैठक सह्यादी अतिथीगृह येथे संपन्न झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर केस सुरु आहे. त्या संदर्भात काय सद्यस्थिती आहे. आपण काय केले पाहिजे, सीमा भागातील आपल्या नागरिकांना कशापद्धतीने सवलती दिल्या पाहिजेत, त्यांच्या पाठिशी कसे उभे राहिले पाहिजे अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती पाहता आता रब्बीच्या पेरण्या किंवा नव्या पिकांसाठी प्रयत्न सुरु असतील. यासाठी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना जे शेतकरी बिल भरु शकतात त्यांनी वीज बील भरले पाहिजे. पण जे शेतकरी अडचणीत आहेत त्यांनी सध्याचे बिल भरले नाही तरी त्यांना सूट देण्यात यावी. त्यांचे वीज कनेक्शन तोडू नये. भविष्यात त्यांच्याकडून आपल्याला वीज बील वसूली करता येईल, असा सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषीपंपा संदर्भातील वसूलीबद्दल काही प्रमाणात तक्रारी प्राप्त झल्या आहेत. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या भागात सक्तीची वसुली करु नये. केवळ एक बील घेऊन विषय बंद करा, असे महावितरणला सांगितले आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *