Breaking News

ठाकरे गटात पुन्हा दोन तट

कोकणातील नियोजित रिफायनरी प्रकल्प नाणार येथे होणार होता. मात्र स्थानिक नागरीकांच्या रेट्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यास विरोध करत फडणवीस सरकारला नाणार येथून तो प्रकल्प रद्द करायला लावला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून रिफायनरी प्रकल्प बारसू येथे करण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु झाल्यानंतर उध्दव ठाकरे गटात पुन्हा दोन तट पडल्याचे दिसून येत आहे.

नाणार येथील नियोजित रिफायनरी प्रकल्प  आता बारसू येथे करण्याचे शिंदे-फडणवीस सरकारने निश्चित करण्यात आले. त्यानंतर आता त्यादृष्टीने हालचाली सुरु झालेल्या असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी बारसूमधील प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. तर खासदार विनायक राऊत यांनी विरोध कायम असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ठाकरे गटातच आता रिफायनरी प्रकल्पावरून परस्पर विरोधी भूमिका घेतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आधीच शिवसेनेतील बंडखोरीवरून ठाकरे गटात अद्यापही चिंतेचे वातावरण आहे. त्यात आता पुन्हा रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा दोन गट पडले.

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा प्रखर विरोध होता. कोकणातील बागायती फळपीक, आंबा प्रकल्पावर याचा परिणाम होईल, अशी भिती व्यक्त केली जात होती. सुमारे सव्वाशे गावांनी या प्रकल्पाविरोधात तक्रारी केल्या होत्या. राज्य शासनाने यामुळे बदल करुन बारसू, गोवळ येथे प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला. येथील बहुसंख्य स्थानिक नागरिकांनी प्रकल्पाच्या बाजूने कौल दिला आहे. बारसू, गोवळ मधील प्रकल्पाबाबत आज मंत्रालयात उदय सामंत यांनी बैठक बोलावली होती. स्थानिक आमदार राजन साळवी देखील उपस्थित होते. दरम्यान, स्थानिकांनी रिफायनरी पाठिंबा दिला आहे. स्थानिकांच्या समर्थनामुळे पाठिंबा दिला आहे. मात्र, रिफायनरी बाबत पाच महत्वाचे मुद्दे राज्य शासनाकडे मांडले. संपूर्ण कोकणात बेरोजगारी वाढली आहे. स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी द्यावी, गावातील लोकांना प्रथम प्राधान्य द्यावे, पाण्याचा प्रश्न सोडवावा, रुग्णालयाची व्यवस्था करावी, अशी मागणी साळवी यांनी केली. राज्य शासनाने या मुद्द्यांवर स्पष्टीकरण न दिल्यास आमचा विरोध कायम राहिल, असे साळवी यांनी जाहीर केले.

खासदार विनायक राऊत यांची रिफायनरी विरोधातील भूमिका आजही कायम आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बोलावलेल्या बैठकीला देखील ते उपस्थित राहिले नव्हते. राजन साळवी यांना याबाबत छेडले असता, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. परंतु, स्थानिकांनी रिफायनरीचे समर्थन केल्याने पाठिंबा दिल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

खासदार विनायक राऊत नेते आहेत. पक्षाचे सचिव आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर अधिक बोलणार नसल्याचेही साळवी यांनी स्पष्ट केले.

केमिकल सारखा प्रकल्प येत असताना, स्थानिकांचा विरोध होणे सहाजिकच आहे. बागायतादारांच्या परिणाम होणार आहे. विरोधाचे ठराव मंजूर केले आहेत. स्थानिकांचा विरोध असताना, रिफायनरी सारख्या प्रकल्पासाठी आमदार, खासदारांच्या बैठका बोलवायच्या. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे हे योग्य नाही. आमचे नाते, बांधिलकी स्थानिकांशी आहे. त्यांची बाजू घेऊन आजपर्यंत उभे राहिलो आहोत. त्यामुळे उद्योग मंत्र्यांनी प्रथम स्थानिकांशी बोलावे, असे खासदार विनायक राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *