Breaking News

Tag Archives: konkan

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर, साईबाबा ताकद दाखवेल…

लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता अद्याप जाहिर झालेली नसतानाच राज्यात विविध राजकिय पक्षांनी निवडणूक मोर्चेबांधणी आणि प्रचाराला सुरुवात केलेली आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने कोकण दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यात कणकवली येथील विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. परंतु उद्धव …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा पलटवार, …तर तुमच्यावर ही परिस्थिती आली नसती

मध्यंतरी काहीजण आले होते. त्यांनी जाहिरपण सांगितलं की उद्धव ठाकरे यांना जमिन दाखवू. त्यानुसार आपल्यातील गद्दारांना सोबत घेऊन त्यांच्या मध्यस्थीने पक्ष काढून घेतला, पक्षचिन्ह काढून घेतलं. इतकंच काय सध्या आपल्या सोबत असलेल्या आमदार, खासदार नगरसेवकांच्या घरावर धाडी टाकल्या. तरीही हा उद्धव ठाकरे उभा कसा असा प्रश्न त्यांना पडला असून त्यांना …

Read More »

शेतकऱ्यांच्या फळ पीक विम्याचे पैसे “या” तारखेला मिळणार

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह ३ जानेवारीपूर्वी अदा करावेत, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील ७५०० शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी ३५०० शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची …

Read More »

भाजपा आ. प्रविण दरेकरांच्या मागणीवर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

विधान परिषदेत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज कोकणातील आंबा, काजू उत्पादकांबाबत प्रश्न उपस्थित केला. कोकणात आंबा, काजू ही काही पिकं आहेत त्यावर प्रोसेसिंग आणि स्टोरेज करण्यासंदर्भात मोठी योजना किंवा घोषणा शासनाकडून अपेक्षित असल्याची मागणी दरेकरांनी केली. त्यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आंबा, काजुची न मिळालेली विमा रक्कम …

Read More »

कोंकणचा विकास हाच आमचा ध्यास ; कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनी प्रकल्पाचे भूमिपूजन

कोंकण हे महाराष्ट्राचे वैभव आहे. कोंकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोंकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोंकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोंकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. खेड लोटे एमआयडीसी येथे हिंदुस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनीच्या प्रकल्पाचे भूमिपुजन मुख्यमंत्री …

Read More »

वाढवण बंदर प्रकल्प रोजगार वृद्धीसह स्थानिकांच्या विकासासाठी पूरक

वाढवण बंदर प्रकल्प हा फक्त राज्याच्या नव्हे, तर देशाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा व हिताचा तसेच रोजगार वृद्धी करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सर्वांनी समन्वयाने सकारात्मकरित्या मार्ग काढला पाहिजे. पालघर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन हा प्रकल्प यशस्व‍िरित्या पूर्णत्वास नेला पाहिजे. वाढवण बंदर प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा हा भूमिपुत्र व …

Read More »

मतदार नोंदणी सुरुः गृहनिर्माण सोसायट्यांध्ये मतदान केंद्र उभारणार विधान परिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर आणि नाशिक, मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तसेच नाशिक आणि मुंबई विभागाच्या शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. यासंदर्भात आज मंत्रालयात देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत देशपांडे यांनी ही …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा दिलासा, गणेश भक्तांना टोल माफी, पण पासेस या ठिकाणी असा मिळणार कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही …

Read More »

पनवेल ते सिंधुदुर्ग राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी गणेशोत्सव काळासाठी राज्य सरकारचा निर्णय

गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या पार्श्वभूमीवर पनवेल ते सिंधुदुर्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम १५५ मधील तरतुदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पनवेल ते …

Read More »

हवामान खात्याचा इशाराः पाऊस राहणार महिनाभर मुंबई, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात कोसळण्याचा अंदाज

मागील ऑगस्टचा महिना जवळपास कोरडा राहिल्याने राज्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जन्माष्टमीपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबई कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात जवळपास महिनाभर हजर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. या कालावधीत अनेक जिल्ह्यांच्या तहानलेल्याना …

Read More »