Breaking News

राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे गटही नाराज

‘छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श झाले आहे’, असं विधान केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे प्रत्येक व्यक्तींना त्यांच्याबद्दल आदर असला पाहिजे’ असं म्हणत शिंदे गटाचे नेते राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. या वक्तव्यावरून राज्यभरात ठिकठिकाणी महाविकास आघाडी संतप्त निदर्शने आंदोलन करीत आहे. या वादावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. प्रत्येक व्यक्तींना त्यांच्याबद्दल आदर असला पाहिजे. मी असो किंवा दुसरा कोणी असो त्यांच्याबद्दल जबाबदारीने व्यक्तव्य केलं पाहिजे, असं म्हणत उदय सामंत यांनी राज्यपालांना सल्ला दिला.

राहुल गांधी यांनी ४ ते ५ दिवस जो उपक्रम राबवला आहे. राहुल गांधी हे सावरकर यांच्या विषयी बोलत आहेत. ते इतिहास न वाचता बोलत आहेत. वीर सावरकर यांचा महाराष्ट्रला देशाला अभिमान आहे.आजूबाजूचे घटक पक्ष आहेत त्यांनी विचार करावा, राहुल गांधी यांचा काय करायचं त्यांच्या कानात कुणी काय सांगायचं. राहुल गांधी यात्रा करत आहे फक्त आपलं फिटनेस कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी करत आहे राहुल गांधी यांचा राजकीय वजन कमी झालं आहे, असा टोलाही सामंत यांनी लगावला

सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी बोलत आहेत त्यावर गप्प का आहे. ही लोकशाही आहे प्रत्येकाला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. जसा त्यांनी प्रश्न उपस्थित केला तसा मी प्रश्न करत आहे, सावरकरांबद्दल राहुल गांधी बोलले आहे. तुणतुणं वाजवत आहे त्यावर तुमची प्रतिक्रिया काय घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर होणार का? असा सवाल सामंत यांनी संजय राऊत यांना केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार आणि ठाकरे कुटुंबावर एकदाही टीकेची संधी न सोडणारे निलेश राणे यांनी राज्यपालांच्या विधानावरून तीव्र संताप व्यक्त केला. ‘महामहीम राज्यपाल साहेब, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आजच्या युगातला माणूस कितीही महान असला तरी होऊ शकत नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, महाराज ही व्यक्ती नाही आमचा दैवत आहे आमची श्रद्धा आहे. महाराजांच्या जागेवर कोणाचीही तुलना करणं महाराष्ट्राला सहन होणार नाही’ अशा शब्दांत निलेश राणे यांनी राज्यपालांना खडेबोल सुनावले.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *