Breaking News

राज्यपालांच्या आदेशानंतर शिवसेना सर्वोच्च न्यायालयात, निर्णय संध्याकाळी कागदपत्रे तयार करून सादर करा

राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर आणि सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर काल रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीहून परतल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत राज्य सरकार अल्पमतात आल्याचे सांगत बहुमत सादर करण्याची मागणी केली. या मागणीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तात्काळ दखल महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शिवसेनेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेत हा आदेश बेकायदेशीर असल्याचा दावा करत याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली.

सर्वोच्च न्यायालयानेही शिवसेनेच्या याचिका दाखल करून घेत संध्याकाळी ५ वाजता सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण करून न्यायालयात सादर करावी असे आदेशही शिवसेनेला दिले. शिवसेनेच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला गुरुवारी बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. यानंतर शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. न्यायालयानेही याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली. संध्याकाळी पाच वाजता शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दुपारी ३ पर्यंत आम्ही सर्व कागदपत्रं रेकॉर्डवर ठेवू अशी माहिती सुनील प्रभू यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली.

सुनील प्रभू यांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडताना ही बहुमत चाचणी बेकायदेशीर असून १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही असं सांगितले. आजच यावर सुनावणी व्हावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

जोपर्यंत तुम्ही आम्हाला कागदपत्रं देत नाही तोवर आम्हाला बहुमत चाचणी कधी आहे कसं कळणार अशी विचारणा केली. यावर अभिषेक मनू सिंघवी यांनी आपण आज संध्याकाळपर्यंत कागदपत्रं सादर करु असं सांगितले. हवं तर ६ वाजता सुनावणी ठेवा अशी विनंतीही त्यांनी केली.

यावर राज्यपालांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी बहुमत चाचणीसाठी बोलावणे हा राज्यपालांचा अधिकार असून त्यात मध्यस्थी केली जाऊ शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत, अपात्रतेचा अर्ज प्रलंबित राहण्याचा याच्याशी काहीही संबंध नाही असं सर्वोच्च न्यायालयानेच सांगितल्याचा युक्तिवाद राज्यपालांच्या वकीलांनी केला.

यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांनी हे प्रकरण तातडीने ऐकावं लागेल असे स्पष्ट केलं आहे. तसेच आजच ५ वाजता सुनावणी होईल असं स्पष्ट केले. न्यायालयाने अभिषेक मनू सिंघवी यांनी ३ वाजेपर्यंत कागदपत्रं तयार ठेवण्यास सांगितले आहे.

Check Also

भारताने अमेरिकेचा धार्मिक आयोगाचा अहवाल फेटाळला

भारताने गुरुवारी यूएस सरकारच्या आयोगाने – आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील आयोग (यूएससीआयआरएफ) – धार्मिक स्वातंत्र्यावर जारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *