Breaking News

फडणवीसांचा मुख्यमंत्र्याना टोला, यापेक्षा दुसरे काही करणार आहात का? मोदींना प्रत्युत्तर दिल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंवर साधला निशाणा

बिगर भाजपाशासित राज्यातील राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केली नसल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या राज्यातील नागरीकांना भेडसावत असलेल्या महागाईस तेथील राज्य सरकारेच जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्वाधिक महसूल मुंबईसह महाराष्ट्रातून केंद्राच्या तिजोरीतून जातो. मात्र महाराष्ट्राला केंद्राकडून सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचा पलटवार केला.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या उत्तरवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावत यापेक्षा दुसरे काही करणार आहात का ? असा खोचक सवाल ट्विट करत केला.
दोषारोप आणि जबाबदारी झटकणे यापेक्षा दुसरे काही करणार आहात का? असा सवाल करत मुद्दा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा आणि तुम्ही जीएसटीचा विषय घेवून बसलात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची पोलखोल केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
जीएसटीचा निधी राज्याला नियमित मिळतच असतो, जुनीही थकबाकी मिळाली, उरलेली देण्याची मुदत जुलै २०२५ पर्यत आहे. मग जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलवर आकारलेला अतिरिक्त कर ग्राहकांना परत करणार का ? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केला.

शेजारच्या दीव-दमणमध्ये १०३ रूपयात पेट्रोल मिळते, तर महाराष्ट्रात १२० रूपयांना का? याचे उत्तर मिळालेच पाहिजे आणि दुसरे म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाचा आदर करत महाराष्ट्रातील जनतेला, मराठी माणसाला तात्काळ दिलासा द्या असे आवाहनही त्यांनी केले.
त्याचबरोबर पेट्रोल-डिझेलवरील अतिरिक्त करांमधून महाराष्ट्राने ३ हजार ४०० कोटी रूपयांची नफेखोरी आधीच केली असल्याचा दावा फडणवीस यांनी करत माझी राज्य सरकारला विनंती आहे की, त्यांनी तात्काळ कर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, कोविड संसर्गाच्या प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज पडली. या बैठकीत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिगर भाजपा शासित राज्यांना तेथील महाग पेट्रोल-डिझेलवरून महागाईस तेथील राज्य सरकारांना जबाबदार धरले. तसेच महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी खासकरून जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील अतिरिक्त करात कपात करावा अशी विनंतीही केली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *