Breaking News

Tag Archives: price hike of petrol diesel and gas

भाजपा म्हणते, आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या अज्ञानाचे पुन्हा दर्शन घडविले भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची घणाघाती टीका

केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकार पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट मध्ये कपात करण्यास नकार देऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेची लूट करीत आहे , असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी गुरुवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करण्याच्या केलेल्या आवाहनाला उत्तर देताना जीएसटी चा मुद्दा …

Read More »

मोदींच्या त्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, जेवढा कर जातो त्या तुलनेत…. पण सर्वात आधी केंद्राचा कर नंतर राज्यांचा कर

पेट्रोल-डिझेलवर महाराष्ट्रात असलेल्या व्हॅट टॅक्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीत महाराष्ट्रावर आरोप करत राज्यातील महागाई वाढीस महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरले. त्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही प्रत्युत्तर देत थकीत जीएसटीच्या रकमेवरून निशाणा साधला. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी …

Read More »

फडणवीसांचा मुख्यमंत्र्याना टोला, यापेक्षा दुसरे काही करणार आहात का? मोदींना प्रत्युत्तर दिल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंवर साधला निशाणा

बिगर भाजपाशासित राज्यातील राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केली नसल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या राज्यातील नागरीकांना भेडसावत असलेल्या महागाईस तेथील राज्य सरकारेच जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्वाधिक महसूल मुंबईसह महाराष्ट्रातून केंद्राच्या तिजोरीतून जातो. मात्र महाराष्ट्राला केंद्राकडून सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचा …

Read More »

पेट्रोल-डिझेलवरील पंतप्रधान मोदींच्या आरोपाला मुख्यमंत्री ठाकरेंचे प्रत्युत्तर पण केंद्राकडून आर्थिक बाबतीत सापत्नभावाची वागणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशातील काही राज्यांमध्ये कोविडच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. मात्र या या बैठकीत कोविडबरोबरच बिगर भाजपाशासित राज्यांमध्ये असलेल्या पेट्रोल-डिझेलवरील कराच्या अनुषंगाने आणि वाढीव किंमतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारांना जबाबदार धरत या महाराष्ट्रातील …

Read More »

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रासह या राज्यांना केली पेट्रोल-डिझेलवरून विनंती करात कपात करण्याची केली सूचना

मागील काही महिन्यापासून संपूर्ण देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईच्या जाचक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र, केरळ, तामीळनाडूसह सात राज्यांना वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर आकारण्यात येणाऱ्या करात कपात करावी अशी विनंती केली. तसेच कर कपातीवरून मी कोणावर टीका करत नाही तर विनंती करत असल्याचेही …

Read More »

पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीवरून सुप्रिया सुळे म्हणाल्या, दर महिन्याला निवडणूका… साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचा निकाल लागत पाच पैकी चार राज्यात भाजपाने पूर्ण बहुमताने सरकारे स्थापन केली. त्यानंतर केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या दरात एकदम २५ रूपये तर डिझेलच्या १० रूपये तर पेट्रोलच्या दरात ८० पैशाने वाढ केली. त्यामुळे आधीच कोरोना संसर्ग रोखण्याच्या नावाखाली लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेचे या दरवाढीमुळे …

Read More »

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपाची पेट्रोल, डिझेल, गॅसच्या महागाईची भेट महागाईसारख्या ज्वलंत प्रश्नावर भाजपा नेते गप्प का ?: नाना पटोलेंचा सवाल

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरात केंद्रातील मोदी सरकारने वाढ करून सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला पुन्हा एकदा भाजपाने महागाईच्या गर्तेत लोटले आहे. निवडणुकीचे दिवस असताना इंधन दरवाढ रोखून ठेवली होती पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच भारतीय जनता पक्षाने जनतेला महागाईची भेट दिली …

Read More »