Breaking News

संजय राऊतांचे सूचक विधान, प्रत्येकवेळी शिवसेना त्याग करणार नाही, मात्र विस्कळीतपणा… सेना नेत्यांच्या बैठकीनंतर दिली माहिती

विधान परिषद निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ.सुधीर तांबे यांच्या उमेदवारीवरून विसंवाद असल्याचे दिसून आले. मात्र नाशिकमधील भाजपाच्या माजी नेत्या तथा अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने घेतली असून नाशिकच्या बदल्यात नागपूर पदवीधर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देत प्रत्येकवेळी शिवसेना त्याग करणार नाही असे सूचक वक्तव्य करत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला इशारा दिला.

नाशिकमधील काँग्रेसचे उमेदवार डॉ.तांबे आणि त्यांचे सुपुत्र सत्यजीत तांबे यांनी घोळ घातला. त्यामुळे तेथील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी काल रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा मागितला. शिवसेनेनेही त्यांची संपूर्ण तयारी पाहुन शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाशिकची जागा आता शिवसेना लढवित असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना नेत्यांची बैठक झाल्यानंतर संजय राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले, नाशिकची जागा शिवसेना लढवित असल्याने नागपूरची जागा जी वास्तविक शिवसेनेची होती. त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तेथील शिवसेनेच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्याचबरोबर या निवडणूकीत महाविकास आघाडीत कमालीचा विसंवाद आणि विस्कळीत पणा असल्याचे दिसून आले. मात्र यापुढील निवडणूकींना सामोरे जायाचे असेल आणि जिंकायचे असेल तर आघाडीत नीट चर्चा झाली पाहिजे आणि त्यादृष्टीने नियोजन झाले पाहिजे. नाहीतर प्रत्येक वेळी शिवसेना त्याग करणार नाही असे सूचक वक्तव्य केले.

त्याचबरोबर या निवडणूकीच्या अनुषंगाने आज सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उध्दव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्या चर्चा झाली. या बैठकीनंतर सेना नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर नाशिकची जागा शिवसेनेने तर नागपूरची जागा काँग्रेस लढविण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *