Breaking News

मंत्री आव्हाडांचे राज ठाकरेंना निमंत्रण वजा आव्हान, सकाळी लवकर उठून या मुंब्राला मदरशावरून आव्हाडांचे आव्हान

गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंबईसह मुंब्र्यातील अनेक मदरशामध्ये एकदा जाऊन बघा तिथे फार गंभीर प्रकार सुरु आहेत. त्यांच्यावर धाडी घाला असे आवाहन करत. एकेक आवरता आवरता असा नाकीनऊ येवू शकेल असे सूचक वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली. त्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना निमंत्रण वजा आव्हान देत, सकाळी लवकर उठून मुंब्य्रात या मी तुम्हाला घेवून जातो मदरशांमध्ये तेथे जर आक्षेपार्ह आढळले तर मी राजकारणातून संन्यास घेईन असे आव्हान दिले.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत राज ठाकरेंच्या भाषणावर टीका केली असून राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले. माझे राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईन असे जाहीर आव्हानच दिले.

मुंब्र्यात काही शतकं हिंदू-मुसलमान प्रेमाने राहतात. मुंब्र्याला बदनाम करू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कळवा-मुंब्रा मतदारसंघात ६७ टक्के हिंदू आहेत आणि ३३ टक्के मुसलमान आहेत. त्यात मी कळव्यातून ५७ हजार मतांनी विजयी झालो. कळव्यातून ३० हजारची आणि आणि मुंब्र्यातून ४५ हजार मतांची आघाडी मिळाली होती. लोक कामावर मत देतात, जाती पातीवर नाही. १८ तास राबावे लागते. शेवटच्या माणसापर्यंत पोहचावे लागते असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

 

महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ते मशिदीबाहेर भोंगे घेऊन पोरांना बसायला सांगणे, हा प्रवास आहे राज ठाकरे यांचा असा खोचक टोला लगावत प्रबोधनकारांची पुस्तके वाचली तर जात-पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील. शरद पवारां नाव घेतले की महाराष्ट्रात चर्चा होतेच हे गणित डोक्यात ठेऊन काही जण भाषण करतात अशी टीकाही त्यांनी यावेळी राज ठाकरेंवर केली.

६ डिसेंबरला चैत्यभूमीला भेट देणाऱ्या बंधू भगिनींबद्दल आपण काय बोललात हे कुणी विसरलेले नाही. नुसत्या मिरवणूका काय काढायला सांगता. संविधानाचा सन्मान राखीन अशी शप्पथ घ्या. तुमचे भाषणच संविधान विरोधी होते आणि हो भाषणाच्या शेवटी जयभीम देखील म्हणा असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Check Also

दारूप्रमाणेच पेट्रोल-डिझेलवरील कर ५० टक्क्याने कपात करा भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

जनतेच्या खिशातून हजारो कोटींची लूट केल्यानंतर आता पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये अनुक्रमे २.०८ रुपये व …

Leave a Reply

Your email address will not be published.