Breaking News

वाढत्या महागाईमुळे पिशवीतून पैसे आणि खिशातून सामान आणावे लागेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची सरकारवर उपरोधिक टीका

जळगाव -चाळीसगावः प्रतिनिधी

आज महागाई इतकी वाढतेय की पिशवीतून पैसे न्यावे लागतील आणि खिशातून सामान आणावे लागतील अशी उपरोधिक टीकामाजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी चाळीसगाव येथील जाहीर सभेत केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या दुसर्‍या टप्प्यातील सभेला भुजबळ यांच्या बरोबरच विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी संबोधित केले.
मुलींना छळले जात असल्याने मुली आत्महत्या करत आहेत आणि शेतकरी ही सुखी नाही. तुम्हाला एवढं घडूनही दिसत नाही का असा संतप्त सवाल करत
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सव्वाशे कोटी लोकांनी शिरोदत्त मानले आहे. त्यामुळे सांगून ठेवतो राज्यातील कुठल्याही महिलेला किंवा कुटुंबांना त्रास दिला आणि त्यांना न्याय दिला नाही तर गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
एवढं सुंदर महाराष्ट्र सदन बांधले. परंतु बनवणारा मात्र जेलमध्ये गेला. १०० कोटीचे कॉन्ट्रॅक्ट आणि मग मला साडेआठशे कोटी कसे मिळतील असा सवाल करतानाच या गोष्टीने छगन भुजबळ थांबणार नाही, घाबरणार नाही म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. अरे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर पंगा झाला… तुम्ही तर काय आहात असेही आमदार छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितले.
यांना राममंदिर बनवायचं नाहीय… यांना सरकार बनवायचं आहे… पुन्हा एकदा जाती-जातीमध्ये भांडणं लावून तुम्ही मुर्ख आहात हे दाखवून दयायचे असे काम सरकार करत आहे असेही आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले.
ही लढाई संविधान विरुद्ध मोदी अशी आहे.संविधानाने सव्वाशे कोटी लोकांना एका धाग्यात बांधून ठेवले आहे ते संविधान आपल्याला वाचवायचे आहे असे आवाहनही आमदार छगन भुजबळ यांनी केले.
जलयुक्त शिवाराचे बिंग फुटेल म्हणून टँकर दिले जात नाहीत – अजित पवार
जलयुक्त शिवाराचं बिंग फुटेल म्हणून दुष्काळग्रस्त गावामध्ये टँकर दिले जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला.
जळगाव जिल्हयासह राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. परंतु सरकारने त्याठिकाणी काहीच दिले नाही. अरे पाण्यावाचून जनतेने जगायचं कसं असा संतप्त सवालही त्यांनी केला.
शेतकऱ्यांची नाडी ओळखणारे… तुमचे आमचे नेते शरद पवार कृषी मंत्री असते तर आज शेतकऱ्यांची वाईट अवस्था झाली नसती. साहेबांनी ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली आणि आज किती लोकांना कर्जमाफी मिळाली असा सवाल करत पाण्यावाचून युध्द होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे आणि आज तशी स्थिती उद्भवते की काय अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पराभवाच्या मानसिकतेमधून घोषणांचा महापूर-जयंतराव पाटील
पराभवाची मानसिकता झाल्याने घोषणांचा महापूर यांच्याकडून सुरु झाला आहे. अरे बाबांनो आता सुचलंय का हे शहाणपण सुचलं का अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी जाहीर सभेत भाजपाचा समाचार घेतला.
अरे लाज विकून खाल्लीय या सरकारने -धनंजय मुंडे
भाजप सेनेला लाज वाटायला हवी या राज्यात राज्य करताना… १६ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढले… अरे लाज विकून खाल्लीय या सरकारने अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
२०१४ मध्ये आजची तरुणाई हर हर मोदी घरघर मोदी म्हणत होती आणि आज तीच तरुणाई गळी गळी में शोर है चौकीदार चोर है… आणि आता विचारलं तर साडेचार वर्षांत साधी सोयरीकही झाली नाही असं सांगत आहे. देश बदलतोय की नाही माहित नाही परंतु आता हा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय होतोय… परिवर्तन होतेय…असेही ते म्हणाले.
आता पुन्हा वेगवेगळी आश्वासने.. स्वप्न दाखवतील परंतु मालिकेच्या अगोदर किंवा सिनेमाच्या अगोदर ही कथा काल्पनिक आहे अशी सूचना येते त्याप्रमाणे यांची भाषणे काल्पनिक असतील हे लक्षात ठेवा असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *