Breaking News

मेट्रो उद्घाटनाला फडणवीसांना निमंत्रण नाही, मात्र भाजपाच्या “त्या” खासदाराला विशेष आमंत्रित एमएमआरडीच्या निमंत्रण पत्रिकेत फडणवीसांचा उल्लेखही नाही

भाजपा आणि महाविकास आघाडी विशेषतः शिवसेनेशी सुरु असलेली राजकिय लढाई फारच हमरी-तुमरीवर आल्याचे दिसत आहे. मुंबईतल्या दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन गुढी पाढव्याच्या दिवशी होत असताना मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या उद्घाटनाचे निमंत्रण नसल्याची माहिती उघडकीस आली असून त्यांच्याऐवजी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना निमंत्रित करण्यात आल्याचे एमएमआरडीएच्या निमंत्रण पत्रिकेवरून दिसून येत आहे. मात्र या कार्यक्रमासाठी भाजपाचे खासदार तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका-टीपण्णी करणारे बंडखोर खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना विशेष निमंत्रित करण्यात आले.
गुढी पाडवा दिनाचे औचित्य साधत मेट्रो प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील मार्गिका ७ आणि मेट्रो मार्गिका-२ यांचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रम मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, आणि भाजपाचे बंडखोर खासदार सुब्रमण्यम स्वामी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांबरोबरच भाजपाच्या खासदारांना निमंत्रित करण्यात आल्याचे निमंत्रण पत्रिकेद्वारे दिसून येत आहे.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट शिवसेनेवर हल्ला करत शिवसेनेची दुखरी नस असलेल्या मुंबई महापालिकेकडून कोविड सेंटर वाटपात मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मेहुण्यावर धाडी टाकत मालमत्ता जप्त करण्यात आली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामधील संबध आणखीनच खराब झाल्याचे दिसून येत आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करणारे भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना मात्र विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रित कऱण्यात आले आहे. त्यामुळे या बंडखोर खासदार स्वामी उद्या महाविकास आघाडीत दिसले तर नवल वाटायला नको.

Check Also

संजय राऊत म्हणाले; कोणीही असो, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही शिवसेनेचा उमेदवार देऊन निवडूण आणू

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांना शिवसेनेत आल्यानंतर उमेदवारी जाहिर करण्याची अट शिवसेनेकडून घालण्यात आली. …

Leave a Reply

Your email address will not be published.