Breaking News

जून्यांचे अनेक कर्मचारी-अधिकारी नव्या मंत्र्यांच्या प्रतिक्षेत २०० हून अधिकजण आजारपणाच्या सुट्टीवर

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील मंत्र्याकडे आणि त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शिपायांना नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे वेध लागलेले आहे. त्यामुळे जून्या मंत्र्यांच्या कडच्या अनुभवाचा फायदा नव्या मंत्र्याकडे करून घेण्यासाठी या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मूळ विभागात रूजू होण्याऐवजी आजारपणाच्या सुट्टीवर जाणे पसंत केल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
गतवेळच्या राज्य मंत्रिमंडळातील बहुतांष मंत्र्यांकडे विशेष कार्यकारी अधिकारी, खाजगी सचिव, कार्यालयीन क्लार्क, शिपाई आदी पदांवर त्या त्या विभागातील कर्मचाऱ्यांना आणि पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्यात नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मंत्र्याकडे असलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्याना आपापल्या मूळ विभागात रूजू होण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र यातील अनेक अधिकारी-कर्मचारी हे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे दिसताच पुन्हा संभावित मंत्र्याकडे रूजू होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हे प्रयत्न सुरू असताना जर मूळ विभागात रूजू झाल्यास संभावित मंत्र्याकडे पिंगा घालता येत नसल्याने नव्या मंत्र्यांकडे रूजू होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी मूळ विभागातील नव्या नियुक्तीवर हजर होण्याचे टाळल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र राज्य मंत्रिमंडळातील खाते वाटप आणि मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होताना दिसत नसल्याचे स्पष्ट होताच या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी थेट आजारी असल्याचे मूळ विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवित रजा घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
आजारपणाच्या नावाखाली मंत्र्याकडे लॉबिंगच्या प्रयत्नात असलेल्यामध्ये वित्त विभाग, महसूल, पशुसंवर्धन, सामाजिक न्याय, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग यासह जवळपास अनेक विभागातील कर्मचारी-अधिकारी असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *