Breaking News

देवेंद्र पाठोपाठ उध्दव यांचाही भूषण गगराणी यांच्यावर विश्वास गगराणी आणि विकास खरगे बनले मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव

मुंबईः प्रतिनिधी
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अधिकारी भूषण गगराणी यांना एमआयडीसीच्या मुख्याधिकारी पदावरून थेट मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव म्हणून साधारणतः एक वर्षभरापूर्वी नियुक्त केले. आता माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापाठोपाठ विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही त्यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती कायम ठेवल्याने एकाच अधिकाऱ्यावर आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी विश्वास दाखविल्याचा प्रकार दुर्मिळच असल्याची चर्चा मंत्रालयात सुरु झाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल आठ दिवसानंतर पहिल्यांदाच प्रशासनातील फेरबदलास सुरुवात केली आहे. या फेरबदलात त्यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव पदावर भूषण गगराणी आणि वन विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे यांची नियुक्ती केली.
निपुण विनायक यांची नगरपालिका प्रशासन येथे आयुक्त आणि संचालक या पदावर नियुक्ती केली असून सचिन कुर्वे यांची महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या व्यस्थापकीय संचालक पदी नियुक्ती केली. आनंद रायते यांची विक्रीकर विभागाच्या सहआयुक्त पदावर नियुक्ती केली असून माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक अमोल येडगे यांची अमरावती जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर तर के.एच. बगते अतिरिक्त जिल्हाधिकारी सरदार सरोवर प्रकल्प नंदुरबार यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केली.

Check Also

राहुल गांधी यांची घोषणा, इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी

लोकसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने संविधानावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *