जे स्वत: बेघर आहेत, अशांनी मुंबईची टीपेलेली छायाचित्रे अचंबित करणारी आहेत. समाजाने नाकारलेल्या बेघरांच्या नजरेतून मुंबईचे ख-या अर्थाने दर्शन होते, असे गौराद्गार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी काढले. निमित्त होते, ‘माय मुंबई प्रोजेक्ट फोटो’ प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे ! ‘पहचान’ संस्थेच्या माध्यमातून ५० बेघर नागरिकांना कॅमेरे देऊन, त्यांच्या दृष्टिकोनातून …
Read More »सलग तिसऱ्यांदा नगरसेवकांशिवाय मुंबई महापालिकेचा ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर पालिकेचा १६ हजार कोटींच्या एफडीवर डल्ला गतवर्षाच्या तुलनेत १४ हजार कोटींची वाढ
मागील तीन वर्षापासून नगरसेवकांशिवाय मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या मार्फत राज्य सरकारकडून हाकला जात असून प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई महापालिकेचा ७४ हजार ४२७ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या प्रशासकाने बँकांमध्ये ठेवलेल्या १६ हजार ६९९.७८ कोटी रूपयांच्या ठेवींवर डल्ला मारत मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मुंबई …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी बृहन्मुंबई क्षेत्रात १० हजार १११ मतदान केंद्रे प्रत्येक केंद्रावर सरासरी १२०० मतदार
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टिकोनातून बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे) मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या तुलनेत मतदान …
Read More »आशिष शेलार यांची मागणी, मुंबईपालिका आयुक्तांनी नाल्यावर येऊन पहावं
मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामात निष्काळजीपणा दाखवत आहे. त्यामुळे पालिकेने ७५ टक्के नालेसफाई कामांबाबत केलेले दावे हे खोटे व रतन खत्रीचे आकडे आहेत. या नालेसफाई कामांबाबत आपण असमाधानी आहोत, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आयुक्तानी नाल्यावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले. नालेसफाईच्या …
Read More »अखेर निवडणूक आयोगाने बदली केलीच, नवे मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी
मागील महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने एकाच ठिकाणी एखादा अधिकारी तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी राहिला असेल तर अशा आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी असे आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र राज्य सरकारकडून मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची बदली करू नये यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना दोन वेळा पत्र …
Read More »बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडून अर्थसहाय्य प्राप्त
बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्थसहाय्य प्राप्त झाल्याची कबूली आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाने ठाण्यातील त्या रुग्णालयावर पोलीस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्याबाबत कळविले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत बोगस प्रकरण किंवा शासनाची फसवणूक केली आहे त्याची …
Read More »दस्तुरखुद्द मंत्री आणि सीएमओ कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून एकच शोधः “काही निरोप” घोषणा करणारा मंत्रीच लागलाय यादी-आदेशाची शोधाशोध
राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह ९ जणांच्या शपथविधी वेळी जितकी गुप्तता बाळगली गेली, तितकीच गुप्तता नव्या मंत्र्यांच्या खाते वाटपाबाबत आणि चवथ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाळत आहेत. त्यामुळे नव्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार, चवथा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार कोणाची नावे यादीत आदी गोष्टींची विचारपूस सत्ताधारी शिंदे-भाजपा …
Read More »अजून थोडे दिवस कळ काढा, जाता येईल शेजारच्या जिल्ह्यात कंटेन्मेंटमधील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंदच राहणार
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोवीड विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता उपाययोजना करण्यात येत असताना हळूहळू आर्थिक व्यवहाराला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेड झोन आणि कंटेन्टमेंट झोनमधील बाधितांची संख्या कमी करण्यावर भर देणे आवश्यक असल्यामुळे आंतर जिल्हा प्रवासावर अजूनही निर्बंध आहेत, जिल्ह्यांच्या सीमा अजून काही काळ बंदच राहणार असल्याचे आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. …
Read More »देवेंद्र पाठोपाठ उध्दव यांचाही भूषण गगराणी यांच्यावर विश्वास गगराणी आणि विकास खरगे बनले मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
मुंबईः प्रतिनिधी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अधिकारी भूषण गगराणी यांना एमआयडीसीच्या मुख्याधिकारी पदावरून थेट मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव म्हणून साधारणतः एक वर्षभरापूर्वी नियुक्त केले. आता माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापाठोपाठ विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही त्यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती कायम ठेवल्याने एकाच अधिकाऱ्यावर आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी …
Read More »सांस्कृतिक संचालनालयाच्या निमंत्रण पत्रिकेवर “संचालक” चेच नाव गायब प्रभारी संचालकाने स्वतःचा उल्लेख संचालक असा केल्याने सांस्कृतिक कार्य मंत्री कार्यालयाचा बडगा
मुंबई: प्रतिनिधी यापुढे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या प्रभारी संचालक यांनी कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेवर आपल्या नावाचा आणि पदाचा नामोल्लेख करू नये.अशा स्पष्ट सूचना सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या कार्यालयातून दिल्याचे विश्वासनिय सूत्रांनी दिली. श्रीमती स्वाती काळे ह्या ११जुलै २०१९ रोजी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतर संचालक पदाचा कार्यभार सध्याच्या सह संचालक यांच्याकडे …
Read More »