Breaking News

मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, मराठ्यांची मुंबईकडे कूच….

राज्यातील मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील पुकारलेल्या आंदोलनाला राज्य सरकारने प्रतिसाद देत नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून फेब्रुवारी २०२४ पासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहिर केले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्या दरम्यान अंतरावली येथे बैठक झाली. परंतु ती बैठक निष्पळ ठरल्याचे दिसून आहे.

त्यातच बीड येथील आज मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी आपण मुंबईतील आझाद मैदानावर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरु करणार असून १ जानेवारी २०२४ रोजी पासून हे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्य सरकारने आधी दिलेल्या चार शब्दांच्या आश्वासनांची पुर्तता करावी आणि तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली. तसेच राज्य सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही तर पुढील आंदोलन मुंबईत करण्यात येणार असून या आंदोलनासाठी राज्यभरातून लाखो मराठा हजर राहिल मात्र त्यांमुळे आलेल्या मराठा समाजाला बसण्यासाठी वेळप्रसंगी रोड मोकळं करून देण्याची विनंती करत अन्यथा आलेला मराठा नेहमीप्रमाणे कोठेही जागाकरून बसेल असा इशारा दिला.

या भाषणा दरम्यान मनोज जरांगे पाटील म्हणाले, आंदोलनाच्या निमित्ताने मराठा समाज एकदा मुंबईत आल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही असा इशाराही यावेळी राज्य सरकारला दिला.

तसेच मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारने मराठ्यांना नोटीसा बसावल्या आहेत. तसेच १८ जानेवारीपर्यंत १४४ कलम लागू केलं आहे. त्यामुळे २० जानेवारी पासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु करणार आहे. माझे आंदोलन सुरु झाल्यानंतर मराठेही मुंबईत येतील शांततेत आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन करू. पण कोण कुठे बसेल तर माहित नाही. रोड मोकळी करून बसण्याची व्यवस्था करावी नाहीतर आमच्या धोरणाने बसू असा इशारा देत मराठ्यांनी मुंबईकडे कुच केली तर विराट समुदाय आरक्षण घेतल्याशिवाय माघाडी फिरणार नाही असा सूचक इशाराही दिला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *