Breaking News

रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मोठे आश्वासन

महाराष्ट्रातील रेल्वेस्थानके आणि रेल्वेरुळालगत रेल्वेच्या जमिनीवर असणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नांवर आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपड्यांवर निष्कासन कार्यवाही तातडीने थांबवण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली.

तसेच रेल्वेरुळालगत ज्या झोपडपट्ट्या आहेत सर्व ४० वर्षा हुन अधिक काळापासून वसलेल्या आहेत अशा झोपडपट्ट्यांचे निष्कासन तातडीने थांबवले पाहिजे. अधिकृत झोपडपट्टीवासीयांचे रेल्वेने महाराष्ट्र शासनाच्या समन्वयाने अधिकृत पुर्नवसन केले पाहिजे. पर्यायी घर देऊन रेल्वेरुळांलगतच्या झोपडपट्टीवासीयांचे पुर्नवसन केल्यानंतरच रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्याच्या निष्कासनचा विचार करावा अशी आग्रही मागणी रामदास आठवले यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.

यावेळी झालेल्या चर्चत रेल्वे मंत्री यांनी रेल्वे रुळा लगत असणाऱ्या झोपडपट्या बाबत आम्हाला सहानुभुती आहे. अनेक वर्षा पासून हे रेल्वे रुळालगत राहणारे जे झोपडीवासी, ज्या झोपडपटट्या आहेत निवासस्थाने आहेत, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्यावर निष्कासन कार्यवाही होत आहे. ती कार्यवाही थांबवण्याबाबत आपण विचार करित आहोत, या झोपडपट्टीवासियांबद्दल सहानुभुति आहे. त्यामुळे त्याच्यावर या झोपडपटया निष्कासनाची कार्यवाही थांबवण्याचा आम्ही विचार करित असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रामदास आठवले यांना दिला.

रेल्वे रुळालगत असणाऱ्या निवासस्थाने, झोपडपटट्या यांना पर्यायी घर देऊन त्यांचे पुर्नवसन करण्याबाबत आणि रेल्वे रुळाजवळ असणाऱ्या झोपडपटट्या बाबत निशकासन थांबवण्याची बैठक मुंबई सह्याद्री अतिथी गृह येथे येत्या पावारी २९ डिसेंबर रोजी सह्याद्री अतिथी गृह, मलबार हिल मुंबई येथे रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक,मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सर्व विभागीय रेल्वे व्यवस्थापक ; म्हाडाचे अधिकारी,एम.एम.आर.डी.ऐ.चे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी आणि सर्व संबंधीतांना या बैठकीत निमंत्रीत करण्यात आले आहे. सर्व संबंधीत अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्यांना अभय दिले जाणार आहे. त्यांचे पुर्नवसन करण्याबाबत विचार विनीमय होणार आहे. महाराष्ट्र शासनाचे अधिकारी सुध्दा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.

केद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या झोपडी महासंघाने नुकतीच भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या झोपडपट्टी आघाडी परिषदेचे अध्यक्ष सुमित वजाळे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत सुमित वजाळे यांनी सुध्दा रेल्वे रुळा लगतच्या झोपडपट्ट्यांच्या बाबत अनेक प्रश्न मांडले. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या झोपडपट्टी परिषदच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *