Breaking News

Tag Archives: रामदास आठवले

रामदास आठवले भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी १२ एप्रिलपासून उत्तर भारतात

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे येत्या १२ एप्रिल पासून छत्तीसगड , मध्य प्रदेश आणि राजस्थान दौऱ्यावर रवाना होणार आहेत. एनडीए चा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे एनडीएचे राष्ट्रीय स्तरावर स्टार प्रचारक आहेत. देशभर सर्व राज्यांत भाजपा उमेदवार आपल्या प्रचारासाठी …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतूनच रिझर्व्ह बँकेची स्थापना

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लम ऑफ द रूपी हा प्रबंध लिहून भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करताना सर्व बँक आणि आर्थिक संस्थांचे संचालन नियंत्रण करणारी मध्यवर्ती राष्ट्रीय स्तरावर बँक असावी अशी संकल्पना शंभर वर्षांपूर्वी मांडली होती. त्या संकल्पनेनुसार १ एप्रिल १९३४ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती कार्यक्रम नियोजनाचा आढावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०२४ रोजी १३३ वी जयंती असून चैत्यभूमी, दादर आणि दीक्षाभूमी, नागपूर येथील कार्यक्रम भव्यदिव्य होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. माटुंगा लेबर कॅम्प हा परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. यामुळे या परिसरात पंचशील कमान उभारण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्राधान्य द्यावे, असे …

Read More »

राज्यात अनुसूचित जाती घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यात सुरू असून अनुसूचित जाती घटकाशी निगडित इतरही प्रश्न सर्व विभागांनी तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा तसेच मुंबई शहरातील विविध प्रश्नाबाबत राज्यमंत्री आठवले यांनी …

Read More »

रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मोठे आश्वासन

महाराष्ट्रातील रेल्वेस्थानके आणि रेल्वेरुळालगत रेल्वेच्या जमिनीवर असणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नांवर आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपड्यांवर निष्कासन कार्यवाही तातडीने थांबवण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. तसेच रेल्वेरुळालगत ज्या झोपडपट्ट्या आहेत सर्व …

Read More »

रामदास आठवले म्हणाले, मराठा आरक्षणासाठी राज्यातही ६९ टक्के आरक्षण करा… मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात आरपीआय शांततापूर्ण आंदोलन करणार

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तामिळनाडूत जसे ६९ टक्के आरक्षण आहे; त्या धर्तीवर महाराष्ट्रात आरक्षण वाढविले पाहिजे. तामिळनाडूत ओबीसी मध्ये दोन प्रकारचे आरक्षण असून एका ओबीसी गटाला ३० टक्के आणि दुसऱ्या ओबीसी गटाला २० टक्के आरक्षण तसेच अनुसूचित जातीला १८ टक्के आणि आदिवासींना १ टक्का आरक्षण असे मिळून ६९ टक्के आरक्षण …

Read More »

नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनानंतरही महाराष्ट्राच्या सुपुत्राला विमान उद्योगाला जमिन मिळेना मेक इन इंडियासाठी परदेशी उद्योगांना जमिन देता मग महाराष्ट्राच्या सुपुत्राला कधी?

मागील काही वर्षात देशाच्या विकासासाठी आणि वायु दलाची ताकद वाढविण्यासाठी कधी अमेरिका तर कधी फ्रांस तर कधी जर्मनीकडून विमाने केंद्र सरकारकडून खरेदी केली जातात. त्यावर कोट्यावधी अब्जावधी रूपयांचा खर्च केला जातो. मात्र परदेशी दर्जाची पूर्णतः भारतीय असलेल्या एका विमान उत्पादन करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार …

Read More »