भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लम ऑफ द रूपी हा प्रबंध लिहून भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करताना सर्व बँक आणि आर्थिक संस्थांचे संचालन नियंत्रण करणारी मध्यवर्ती राष्ट्रीय स्तरावर बँक असावी अशी संकल्पना शंभर वर्षांपूर्वी मांडली होती. त्या संकल्पनेनुसार १ एप्रिल १९३४ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली. रिझर्व्ह बँकेंच्या ९० व्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देतानाच महान अर्थतज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाला अभिवादन करण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
द प्रॉब्लम ऑफ रुपी हा प्रबंध लिहुन रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली त्यामुळे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया रचला आहे असे सांगत रामदास आठवले यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९० व्या स्थापना दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
उद्या सोमवारी १ एप्रिल २०२४ रोजी मुंबईत एनसीपीए येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रिझर्व्ह बॅंकेचा ९०वा स्थापनादिन सोहळा साजरा होणार आहे.या कार्यक्रमास रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे सृवश्रेष्ठ अर्थतज्ञ होते. त्यांच्या संकल्पनेतून रिझर्व्ह बँक स्थापन झाल्याचा इतिहास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक मंचावर अनेकदा मांडला असून डॉ आंबेडकरांचे अर्थतज्ञ म्हणून देशाच्या उभारणीतील योगदानाचा गौरव करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी नोटबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान मोदींनी महमानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थविषयक विचारांचा दाखला दिला होता. अर्थतज्ञ म्हणून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार देशाला आजही मार्गदर्शक आहेत असे रामदास आठवले म्हणाले.