Breaking News

अजित पवार यांची स्पष्टोक्ती…त्या भेटी-गाठी कौटुंबिक

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नरिमन पॉंईट येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात लोकसभा निवडकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपाच्या चिन्हावर निवडणूका लढविण्याच्या अनुशंगाने चर्चा झाली.

त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, भाजपाच्या नेत्यांशी प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर याबाबत बोलेन. पण राष्ट्रवादी काँग्रेस घडाळ चिन्हावरच निवडणूक लढविली जाईल असेही सांगितले.

यावेळी अजित पवार म्हणाले, मी कोणी आरोप केले म्हणून मी महायुतीत सहभागी झालो नाही तर राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोणी काहीही म्हणत असेल तर त्याबाबत प्रत्यारोप करणार नाही.

मध्यंतरीच्या कालावधीत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, आम्ही आमचा राजकिय निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राजकारण आणि कौटुंबिक गाठीभेटी या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तसेच त्या गाठीभेटी या कौटुंबिक होत्या असेही स्पष्ट केले.

तसेच अजित पवार म्हणाले की, आगामी लोकसभा निवड़णूकीत जनता विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहुन मतदान करेल की इंडिया आघाडीचे नेते खर्गे यांना पाहुन जनता मतदान करेल असा सवालही यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सोबत आलेल्या सर्व आमदार आणि खासदारांना धोका देणार नाही. तसेच आगामी निवडणूकीत ज्यांच्यावर देशद्रोहासारखे आरोप आहेत त्यांना लांब ठेवणार असल्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे सांगत नवाब मलिक यांना उमेदवारी न देण्याचा सुतोवाच केला.

सुनिल तटकरे यांची माहिती, …महायुतीची एकत्रित सभा घेण्याचा निर्णय

एनडीएमध्ये घटक पक्ष म्हणून सहभागी झाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत महायुतीची एकत्रित सभा घेण्याचा निर्णयही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात ७ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केला आहे. त्यानंतर दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे अशीही माहिती सुनिल तटकरे यांनी दिली.

आगामी निवडणूकांच्या अनुषंगाने आज पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांसोबत विविध विषयांवर विचारमंथन आणि पक्षाची भविष्यातील वाटचाल यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. पक्षातील विविध पदांच्या नियुक्त्या, बुथ कमिट्या नियुक्ती, याशिवाय जिल्हयाची देण्यात आलेली जबाबदारी याबाबत माहिती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा पवार यांनी घेण्यात आली. आगामी काळात महिला, विद्यार्थी, युवतींसाठीही मेळावे घेणार आहोत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

युवकांचे मेळावेही राज्यभर घेणार आहोत यादृष्टीकोनातून विचारमंथन व वाटचाल करण्यासाठी राज्यभरातील पदाधिकार्‍यांची आज मॅरेथॉन बैठक पार पडली.

सुनिल तटकरे म्हणाले, काही प्रसिद्धीसाठी हपापलेले व्यक्ती स्वतः च्या महत्वाकांक्षेसाठी पक्षाच्या भूमिकेबद्दल वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. येणाऱ्या काळात एनडीएचा घटक पक्ष म्हणून महायुतीच्या सोबत निवडणूक लढवत असताना निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूने लागेल या अपेक्षेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूकीला सामोरे जाणार आहोत हा निर्णय आमचा पूर्वीच ठरला आहे असेही स्पष्ट केले.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *