Breaking News

तेंडूलकर, चोप्राला उत्तर मागत आणखी एक खेळाडू पद्मश्री पुरस्कार परत करणार

अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सरण शर्मा यांचे जवळचे मित्र तथा सहकारी असलेले संजय सिंह यांची अध्यक्ष पदी निवड झाली. परंतु त्यांच्यावरही लैगिन शोषणाचे आरोप असल्याने आणि केंद्र सरकारने ब्रिजभूषण सरण सिंह यांच्या विरोधात तक्रारी असूनही काहीच केले नसल्याच्या निषेधार्थ ऑलंम्पिक पदक विजेती साक्षी मलिक हिने कुस्ती न खेळण्याचा निर्णय जाहिर केला.

त्यानंतरही केंद्र सरकारकडून आणि केंद्रीय गृहमंत्री दिलेल्या आश्वासनानुसार कोणतीच कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ काल बजरंग पुनिया या कुस्ती खेळाडूने काल आपला पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित परत केला. मात्र पद्मश्री पुरस्कार परत करण्यासाठी पंतप्रधान यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या जनकल्याण मार्गावर गेले असता दिल्ली पोलिसांनी त्यांना गेटच्या बाहेरच रोखले. त्यामुळे बजरंग पुनिया यांनी रस्त्यावरच पद्मश्री पुरस्कार ठेवला. या सगळ्या घडामोडीत पोलिसांकडून किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही भूमिका जाहिर केलेली नाही.

यापार्श्वभूमीवर आणखी एक कुस्ती पटू विरेंद्र सिंग यांनीही एक्स या सोशल मिडीयावर ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत मला गर्व आहे, बहिनीच्या सन्मानासाठी पद्मश्री पुरस्कार परत करणार आहे. पण याप्रश्नी भारतरत्न सचिन तेंडूलकर आणि ऑलम्पिंक भालाफेक पटू नीरज चौप्रा यांनी निर्णय द्यावा अशी मागणीही केली.

Check Also

पहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारजागृतीचे विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *