समुद्रीमार्गे इस्त्रायला वस्तूंचा पुरवठा करण्यात येत असल्याच्या संशयातून दुबईहून भारताकडे येणाऱ्या मर्चट शिपवर अज्ञात हल्लेखोरांनी ड्रोनच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र शिपवर ड्रोन हल्ल्यामुळे आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्विकारली नसल्याची माहिती ब्रिटीश लष्कराने दिल्याचे द हिंदू या इंग्रजी दैनिकांने आपल्या वृत्तात दिले म्हटले आहे.
इस्त्रायल-हमास मधील युध्दाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि लिबिया देशातील काही दहशतवादी संघटनांनी हा ड्रोन हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
वास्तविक पाहता भारतीय समुद्राच्या हद्दीत आलेल्या या मर्चंट नेव्हीचे जहाज दुबई मार्गे काही वस्तू घेऊन भारतातील पोरबंदरच्या दिशेने चाललले होते. मात्र जवळपास ३५० ते ४०० नॉटी माइल इंतरावरून ड्रोनच्या माध्यमातून या मर्चंट शिपवर हल्ला करण्यात आला. जहाजावर लिब्रिया देशाचा ध्वज होता. त्यामुळे आखाती देशातील दहशतवादी संघटनांकडून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ज्या मर्चंट शिपवर हल्ला झाला त्या मर्चंट शिपचे मुख्य कार्यालय गुरूग्राम येथे आहे. हल्ल्याची माहिती मिळताच भारतीय नौदलाने पेट्रोलिंग विमान पाठवित जहाजावर असलेल्या क्रु मेंमर्सचे वाचविले. तर तटरक्षक दलानेही सुरक्षेच्या युध्दनौकांना समुद्रात पाठविल्याचे सांगण्यात येत आहे. युकेएमटीओने यासंदर्भात इशारा दिला होता.
UKMTO WARNING 018/DEC/2023
ATTACK – INCIDENT 018 UPDATE 01
UKMTO have received a report of an attack by Uncrewed Aerial System (UAS) on a vessel causing an explosion and fire. https://t.co/qFzIsjDvnj#MaritimeSecurity #marsec pic.twitter.com/gBARms8K9T
— United Kingdom Maritime Trade Operations (UKMTO) (@UK_MTO) December 23, 2023