Breaking News

सुप्रिया सुळे यांचा आरोप, भाजपा हा महिला विरोधी पक्ष

महाराष्ट्राचे आणि देशाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांचा राज्यव्यापी दौरा जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आज अनेक प्रश्नांवर चर्चा करण्याकरिता बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी शरद पवार गटाच्या खासदार तथा कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातील महिलांना भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार याबाबतीत आढावा या दौऱ्यात घेणार आहे . महाराष्ट्रातील महिलांचे युवकांचे जे महत्वाचे प्रश्न आहे त्याला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने महाराष्ट्रातल्या या सक्षम कर्तृत्ववान महिलांच्या बाजूनी उभा राहणार आहे. कारण आज राज्य सरकार आणि केंद्र सरकार कडून अन्याय करण्यात येत आहे. गुन्हेगारीसंदर्भात नवीन कायदे आणलेले आहेत. हे अतिशय चिंताजनक आहे. आता जे नविन कायदे आणले आहेत. त्यामुळे उदाहरणार्थ टेलिकॅाम कायदा आणला, त्यामुळे कोणाचेही फोन टॅप करता येणार आहेत. त्यामुळे प्रायव्हसी पूर्णपणे संपुष्टात येणार आहे अशी भीतीही व्यक्त केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन पोहोचली आहे. राज्यातील महिलांचे प्रश्न घेऊन राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार आहे. सध्या राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी महिलांवर होणारे अत्याचार अन्याय आणि बेरोजगारी या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता हा राज्यव्यापी दौरा असणार आहे असेही स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था विकतची झालेली आहे. गुन्हेगारी संदर्भातील आकडेवारी समोर आली असून हे अतिशय चिंताजनक महाराष्ट्रासाठी बाब आहे. सध्या आकडेवारीनुसार राज्यात महिला वरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वास्तविक पाहता भाजपा महिला विरोधी पक्ष आहे असा आरोपही केला.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, इंडिया आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नाही. सगळीकडे समन्वय आहे. उद्धव ठाकरे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आले होते. समन्वय आहे. लवकरात लवकर इंडिया आघाडी मधील जागावाटप जाहीर होणार असल्याचे सांगत दिल्लीत झालेल्या बैठकीत चर्चा झाली असून १५ ते २० दिवसात जागावाटप निश्चित होणार आहे.

नितीन गडकरी यांच्या विधानाबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मंत्री नितीन गडकरी हे जेष्ठ आहेत. ते ओरीजनल भाजपाचे आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाबद्दल आत्मियता वाटते. जे बोलतात ते खरेच बोलतात असे सांगत मंत्री छगन भुजबळ वयाने मोठे आहेत. ते जर तुमच्या समोर हे मांडत असतील ते हतबल आहेत. ते दुखी आहेत. त्यांचे म्हणणे कॅबिनेटमधे ऐकले जात नसेल, त्यामुळे त्यांनी त्यांचे दुःख मांडले असेल अशी भूमिकाही ओबीसी-मराठा आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने मार्ग काढला पाहिजे सरकारने शब्द दिला आहे. तो त्यांनी पूर्ण करावा. त्यांच्याकडे काही तरी असेल. असे मला वाटते असेही सांगितले.

Check Also

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *