भाजपा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. बेटी बचाव हा पोकळ नारा असून भाजपा महायुती सरकार महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ ठरले आहे, म्हणून महिला काँग्रेस महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्राची स्थापना करणार आहे, अशी घोषणा महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी केली आहे.
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त, कल्याण येथील साईनंदन इन हॉलमध्ये कल्याण-डोंबिवली महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन योगेश कुलकर्णी यांच्या पुढाकाराने महिलांचे भव्य व प्रेरणादायी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी या संमेलनाला दूरदृश्यप्रणालीने संबोधित केले.
Marathi e-Batmya