Breaking News

जयराम रमेश म्हणाले, श्यामाप्रसाद मुखर्जींनी मुस्लिम लीगबरोबर सरकार…

काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्याच्या एका दिवसानंतर, सूत्रांनी सांगितले की, पक्षाने सर्वोच्च भारतीय राष्ट्रीय, विकासात्मक सर्वसमावेशक आघाडी (इंडिया) गटाच्या नेत्यांसह संयुक्त रॅलींसह जाहीर रॅली काढून जाहीरनामा लोकांपर्यंत नेण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत.

इंडिया आघाडीच्यावतीने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या उपस्थितीत पहिली सभा १२ एप्रिल रोजी कोईम्बतूर येथे पहिली जाहिर सभा होणार आहे. त्यानंतर अशा पध्दतीच्या राजकिय सभा उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्रातही इंडिया आघाडीच्या बॅनरखाली घेण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.

शनिवारी, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दावा केला की, लोकसभा निवडणुका “न्यायपूर्ण नाहीत” आणि विरोधी पक्षांना लक्ष्य केले जात आहे, परंतु तरीही, इंडिया ब्लॉकला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळेल.

पुढे बोलताना जयराम रमेश म्हणाले की, “विरोधी पक्षांवर कारवाई होत असल्याने ही निवडणूक न्याय्य नाही पण असे असूनही, काँग्रेसच्या ‘पांच न्याय, पचीस हमी’ ला जनतेच्या प्रतिसादामुळे इंडिया आघाडी ही आता जनबंधन आघाडी बनली [लोक आघाडी] असून स्पष्ट जनादेश मिळेल असा आमचा विश्वास आहे. इंडिया आघाडीतील सहकारी पक्षही लोकांच्या गरजांवर बोलत असल्याचे” सांगितले.

दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत निवडणूकीतील प्रमुख मुद्यांवरून लक्ष हटविण्यासाठी अशा पध्दतीची वक्तव्ये करण्यात येत असल्याची टीका केली.

पुढे बोलताना जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधानांना नेहमीच लोकांच्या प्रश्नांवरून लक्ष वळवायचे असते, मग ते शेतकरी, तरुण, महिला असोत. परंतु मला पंतप्रधानांना एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की १९४० ते १९४२ या काळात हिंदुत्ववादी विचारवंत श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी मुस्लिम लीगसोबत बंगालमध्ये सरकार स्थापन केले होते. पंतप्रधान मोदी नेहमीच फुटीरतावादी राजकारण स्वीकारतात, असा खोचक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना लगावला.

सध्या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेसने अनेक मतदारसंघात काँग्रेसच्या हमी पत्राचे वाटप केले असून त्यावर त्या त्या मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून विशेष पथके नेमली आहेत. या पथकांकडून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सरचिटणीस (संघटना) के.सी. वेणुगोपाल यांनी नुकतीच एक झूम बैठक घेतली. पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश देण्यासाठी पक्ष जाहीरनामा घेऊन आला आहे की त्यांच्या (काँग्रेसच्या) बँक खात्यांवर निर्बंध आणि आयकर (आयटी) विभागांकडून नोटीस यासारख्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

काँग्रेसने आतापर्यंत २४१ उमेदवारांची घोषणा करून आपले निवडणूक प्रयत्न वाढवले असले तरी, उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेलीमधील उमेदवारांवर अद्याप निर्णय घेतलेला नाही. २००४ पासून राहुल गांधी यांनी तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर २०१९ पासून भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याकडून सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यात येत आहे. तर सोनिया गांधी यांनी या सलग पाच वेळा रायबरेलीचे प्रतिनिधित्व केले आहे, परंतु सध्याची लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत.

काँग्रेसच्या आणखी एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, केंद्रीय निवडणूक समिती (CEC) पुढील आठवड्यात निर्णय घेऊ शकते, परंतु पक्षाच्या बहुसंख्य सदस्यांना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांनी अनुक्रमे अमेठी आणि रायबरेलीमधून निवडणूक लढवावी अशी इच्छा कार्यकर्त्यांची आहे.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *