Breaking News

एकनाथ खडसे यांनी सीडी न वाजवताच दिल्ली मार्गे भाजपात वापसी

२०१४ साली राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर एकनाथ खडसे यांच्याकडे सरकारमधील विविध अशा आठ खांत्यांचा कार्यभार देण्यात आला. त्यानंतर भोसरी येथील जमिनीप्रकरणी आणि कल्याण येथील सरकारी जमिन देण्याच्या कथित घोटाळा आणि दाऊदशी फोन वरून बोलल्याच्या कथित प्रकरणावरून अखेर पहिल्या दोन वर्षातच एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरत शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केले. तसेच जर तुम्ही ईडी लावाल तर मी सीडी वाजवेन असा गर्भित इशाराही त्यावेळी भाजपाला दिला. मात्र लोकसभा निवडणूक २०२४ ची घोषणा होताच एकनाथ खडसे हे व्हाया दिल्ली मार्गे भाजपात घरवापसी करणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली.

त्यातच एकनाथ खडसे यांनी भाजपात जात असल्याच्या चर्चांना नाही-होय असे संकेत देत अखेर व्हाया दिल्ली मार्गे भाजपात घरवापसी करणार असल्याची माहिती खुद्द एकनाथ खडसे यांनीच आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

काही महिन्यापूर्वी एकनाथ खडसे यांना रावेरमधून त्यांच्या सून तथा भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूकीची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली होती. मात्र उमेदवारी जाहिर होण्याच्या आदल्या दिवशीच एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रावेरमधून आपण निवडणूक लढण्यास असमर्थ असल्याचे जाहिर केले. त्यावेळी एकनाथ खडसे हे भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. परंतु त्यावेळी खडसे यांनी भाजपात जाणार असल्याच्या फक्त चर्चाच असल्याचे सांगितले होते.

मध्यंतरी एकनाथ खडसे हे त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांच्यासोबत दिल्लीत गेले होते. तेथे खडसे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली होती.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपामध्ये जाण्याचा माझा कोणताही प्रयत्न नव्हता. पण भारतीय जनता पार्टीतील जुने कार्यकर्त्ये आणि नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करताना भाजपामध्ये असायला हवे होते असे सातत्याने म्हणत असत. तसेच हे काही आताच सुरु झालेलं नव्हतं. तर चार-सहा महिन्यापासून सुरु होतं. परंतु माझ्या राजकिय परिस्थितीनुसार मी निर्णय घेऊ शकत नव्हतो. आता केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून ते सांगतील त्या तारखेला दिल्लीत जाऊन दिल्लीत भाजपात प्रवेश करणार आहे.

Check Also

ऑपरेशन सूरत-२ इंदौरमध्येही भाजपाकडून असाच प्रयोग

लोकसभा निवडणूका जाहिर होताच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *