Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, खडसेंच्या प्रवेशावर केंद्र आणि राज्य समिती…

भाजपा पक्षात येण्याचा जर एकनाथ खडसे यांचे मत असेल, तर शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्ष प्रवेश करत आहोतच. पक्षामध्ये येण्यासाठी आम्ही कोणाला नाही म्हणत नाही कारण शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातला भारत आणि त्या उद्देशासाठी येणारी जी काही लोक आहेत, नेते आहेत त्यांचे स्वागत आहेच. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, लातूरच्या डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांचा पक्षप्रवेश झाला. जे जे पक्षामध्ये प्रवेश करतील त्यांचा संघटना वाढवण्यामध्ये उपयोग असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना वरिल मत व्यक्त केले.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी वारंवार सांगतो आहे की एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत केंद्रीय समिती तसेच राज्याची समिती यावर विचार करेल. कारण निर्णय संपूर्णपणे करावे लागतील; तुटक-तुटक निर्णय होणार नाहीत. पण जर एकनाथ खडसे यांचे भाजपामध्ये येण्याचे मत असेल तर आमची केंद्रीय आणि राज्य समिती विचार करेल असेही सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, ग्रीन सिग्नलची गरजच नाही. शेवटी विकसित भारताच्या संकल्पासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात ज्यांना ज्यांना भाजपामध्ये यायचे असेल त्यांच्यासाठी आमचा दुपट्टा नेहमीच तयार आहे. आमच्या पक्षातून गेलेली लोकं असो किंवा काँग्रेसमधून येणारी लोकं असोत. त्यामुळे पक्ष प्रवेशाकरीता आमची कुणाचीही ना नसते असेही स्पष्ट केले.

एकनाथ खडसे यांनी अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्या भेटीचे फोटो बाहेर आल्याबाबत विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे नेहमीच सर्वांना भेटतात. आम्हीही त्यांना भेटतो. त्यामुळे कुठलाही वाद नाही, पण एक निर्णय प्रक्रिया आहेत या प्रक्रियेत जावं लागतं असेही यावेळी सांगितले.

चंद्रसेखर बावनकुळे म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध नाही. फडणवीस हे कधीही खडसे यांच्याविरोधात नव्हते व नाहीत. खडसे यांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातील स्थान देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यापासून दिले आहे; याचा मी साक्षीदार आहे. एकनाथ खडसे हे आमचे नेते होते, त्या काळातही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण सहकार्य केले. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातील एकनाथ खडसे यांच्याबद्दल सन्मान कमी झाला नाही. शेवटी पक्ष बदलत राहतात, लोक येत राहतात. देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिगत संबंध कुणाशीही वाईट नसल्याचा दावाही यावेळी केला.

महायुतीच्या जागा वाटपाबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता म्हणाले की, महायुतीच्या जागेसंदर्भात जवळपास अर्ध्या तासात चर्चा होईल, इतका अंतिम निर्णय झाला आहे. आम्ही बसू तेव्हा अर्ध्या तासात चर्चा होईल. कारण आमचे सर्वांचे एकमत झालं आहे. एक बैठक होईल आणि जागावाटप अंतिम होईल. सातारामध्येही जवळपास जागा वाटपावर निर्णय झाला आहे, लवकरच आपल्याला ते दिसेल असेही यावेळी सांगितले.

Check Also

ऑपरेशन सूरत-२ इंदौरमध्येही भाजपाकडून असाच प्रयोग

लोकसभा निवडणूका जाहिर होताच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *