Breaking News

प्रविण दरेकर यांचा मंत्री पदाचा पत्ता कट मुंबै बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा स्विकारली

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री पदावर वर्णी लागावी यासाठी भाजपामधील आमदारांबरोबरच शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडूनही मोठ्या प्रमाणावर लॉबींग करण्यात येत आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच जाहिर करत सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करता येणार नाही असे सूचक वक्तव्य केले. त्यातच संभावित मंत्र्यांच्या यादीतून प्रविण दरेकर यांचा पत्ता कट झाल्याने त्यांनी आज मुंबै बँकेचे अध्यक्ष पद पुन्हा स्विकारले. त्यामुळे मंत्री पदाच्या शर्यतीतून त्यांचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे.

भाजपामधील जून्या जाणत्यांना माजी मंत्र्यांना संधी मिळणार नसल्याचे यापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले. त्यामुळे भाजपामधील अनेक जून्या आणि ज्येष्ठ आमदारांमध्ये धाकधुकी निर्माण झाली आहे. त्यामुळे मंत्री पद मिळाले नाही तर किमान महामंडळ तरी मिळावे यासाठी भाजपामधील अनेक ज्येष्ठ आमदार प्रयत्नशील आहेत. मात्र फडणवीस समर्थक असलेल्या प्रविण दरेकर यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही याचे स्पष्ट संकेत मिळाल्यानेच मुंबै बॅकेचे अध्यक्ष पद स्विकारले असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्य मंत्रिमंडळात ज्या पध्दतीने भाजपाकडून सर्व नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात भाजपाकडून विधान परिषदेवर निवडूण आलेल्या पाच जणांपैकी चार जणांचा समावेश राज्य मंत्रिमंडळात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर इतर काही नव्या चेहऱ्यांना जे उध्दव ठाकरे प्रणित शिवसेनेच्या विरोधात असणाऱ्यांनाही भाजपाकडून मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याचेही भाजपाच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

त्याचबरोबर आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातूनही जास्तीत जणांना संधी देण्यात येणार असल्याचे बोलण्यात येत आहे. त्यामुळे या नव्या फळीतील नव्या दमाच्या मंत्र्यांच्या भरोस्यावर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला टक्कर देण्याची रणनीती भाजपाकडून आखण्यात आल्याचे सांगण्यात आली आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *