Breaking News

आमदार संतोष बांगर यांच्या वर्तनामुळे मुख्यमंत्र्यांची वाढतेय डोकेदुखी सततच्या आक्रमक वागण्यामुळे तक्रारीत होतेय वाढ

आपल्या आक्रमक शैलीने नेहमीच प्रसिध्दीच्या झोतात असलेले हिंगोलीचे बंडखोर आमदार संतोष बांगर मात्र त्यांच्या आक्रमक वृत्तीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले असून त्यांची डोकेदुखी वाढलेली आहे. स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुद्धा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

आमदार संतोष बांगर नेहमीच कायदा हातात घेत मनमानी कृत्य करीत असताना दिसतात. यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीद्वयींनी त्यांना संयम बाळगून वागण्याचा सल्ला दिला आहे. आमदार बांगर यांनी हिंगोली मध्ये अलिकडे पीकविमा कार्यालयाची पहाणी केली. तेव्हा पिकविमा कंपनीचा कोणताही अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचं दिसले. त्यावेळी आमदार बांगर शेतकऱ्यांसह बराच वेळ कार्यालयात थांबले होते. बांगर आणि शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे संतप्त शेतकरी आणि बांगर यांनी संतापाच्या भरात पिकविमा कार्यालयाची तोडफोड केली. आमदार संतोष बांगर यांच्या अशा वर्तनामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. त्यावर संतोष बांगर यांच्या विषयी उलटसुलट चर्चा रंगली आहे.

काही महिन्यांपूर्वी बांगर यांनी शालेय मध्यान्ह भोजनात देण्यात येणारे अन्न निकृष्ट दर्जाचे सापडले होते. तेव्हा त्याबद्दल जाब विचारत संतोष बांगर यांनी निकृष्ट अन्न पुरविणाऱ्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती. तसेच मध्यान्ह भोजनाचा ग्रामीण भागातून जाणारा वाहनाचा ताफा अडवून अन्न पदार्थांची यादी तपासली तेव्हा वरण, भात, भाजी सह सर्व पदार्थ त्यांनी तपासले होते. तेव्हा तपासणी दरम्यान वरणात आळ्या आढळून आल्याचा आरोप आमदार संतोष बांगर यांनी केला होता. बांगर यांच्या चकीच्या वर्तनुकीमुळे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री चांगलेच संतापले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे कार्यालयाची तोडफोड करून सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे अशा प्रकारच्या घटनांमुळे सरकारची बदनामी होत असल्याने विरोधकांनाही यावर तोंडसुख घेण्यास वाव मिळतो.

यामुळे बोलताना वागताना सरकारची बदनामी होणार नाही असं कृत्य टाळा अशी समज मुख्यमंत्र्यांनी बांगर यांना दिली. आता आपले सरकार आहे. आपण सरकार मध्ये आहोत याचे भान ठेवून काम करा. मतदार संघातील कामे प्रशासकिय नियमा नुसार करुन घ्या, विरोधकांना टीकेची संधी देऊ नका असा सल्लाही मुख्यमंत्र्यानी त्यांना दिल्याचे समजते.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *