Breaking News

बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? भाजपा आमदार गोपीचंद पडकरांची शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊतांवर टीका

सांगली-मुंबई: प्रतिनिधी

आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असा खोचक सवाल करत असंतर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपीतांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल अशी बोचरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांच्यावर केली.

नारायण राणे यांच्या अटक नाट्यानंतर भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका केली. यासंदर्भात त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ भाजपाकडून प्रसारीत करण्यात आला.

राणे साहेबांवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई असे संबोधता मग पोलिसांना त्यांच्या आई बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण देसाईला अटक का होत नाही? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल…? असा सवालही त्यांनी केला.

ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचे नेहमी मार्मिक शब्दाने पितळ उघड पाडल्याची आठवण करून देत पण तुम्ही आज त्यांचाच उदोउदो करणे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार नाही का? असा सवालही त्यांनी केला.

हिंदु समाजाला सडलेला म्हणणारा शर्जील उस्मान उजळ माथ्यानं महाराष्ट्रात येऊन फिरतो आणि त्यावर कारवाई करण्याऐवजी सत्तेच्या लालसेपोटी तुमचे हात थरथर कापतात. मला बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारयेचे की त्यावेळेस यांची आस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते.

माननीय संजय राऊत, कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याची विकृतीला बांध घाला अन्यथा ‘तुमच्या हम करे सो’ कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील असा इशाराही त्यांनी दिला.

Check Also

काँग्रेसचे प्रत्युत्तर; देवेंद्रजी, हेराल्ड प्रकरणी व्यवहारच झाला नाही तर … घोटाळा २ हजार कोटींचा, का ५ हजार कोटींचा हे आधी ठरवा- अतुल लोंढे

ईडीने राहुल गांधी यांना चौकशीसाठी आज पाचारण केल्यानंतर ईडीच्या या कारवाईच्या विरोधात देशभरात आंदोलन करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published.