Breaking News

सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांची खासदारकी रद्द कराः सुप्रिया सुळे यांची शरद पवारांकडे मागणी पक्षविरोधी कारवाया केल्याने पत्राद्वारे केली कारवाई करण्याची मागणी

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडाळी होत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोबत गेलेले लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांना पक्ष विरोधी कारवाया केल्या असल्याचा
ठपका ठेवत या दोघांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि लोकसभेचे सचिव आणि राज्यसभेचे सभापती यांना पत्राद्वारे केली.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी पत्राद्वारे म्हणाल्या की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार पक्षाची कोणतीही परावनगी न घेता ९ आमदारांनी थेट २ जुलै रोजी महाराष्ट्राचे राज्यपालांचे राजभवन येथे जात थेट शपथ घेतली. या नऊ जणांसाठी त्यासाठी कोणत्याही स्वरूपात पक्षाची परवानगी घेतली नव्हती. तसेच या ९ जणांसोबत लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल गेले. त्यामुळे या सर्वांनी पक्षविरोधी कार्यवायांमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पटेल आणि तटकरे यांची खासदार की रद्द करावी अशी मागणी शरद पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली.

तसेच सुप्रिया सुळे म्हणाल्या, पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षांची कोणतीही परवानगी घेतली नाही. त्यामुळे या दोघांचे सरळसरळ पक्षांतर बंदी कायद्यानुसार उल्लंघन होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याशिवाय पटेल आणि तटकरे यांनी वैयक्तीक फायद्याकरीता पक्षाने दाखविलेल्या विश्वासाचा आणि पक्षाच्या मतदारांचा विश्वासघात केल्याचे दिसून येत असल्याने खासदार सुनिल तटकरे आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी पत्राद्वारे केले.

तसेच या दोन्ही खासदारांवर शेड्युल १० व्या कायद्यातील तरतूदींनुसार खासदार म्हणून अपात्र ठरवावे अशी मागणी केली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार

गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *